Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" श्री संत सेना महाराज व क्रांतिवीर भाई कोतवाल " नाभिक समाज...

” श्री संत सेना महाराज व क्रांतिवीर भाई कोतवाल ” नाभिक समाज सभागृहाचे कर्जतमध्ये भूमिपूजन संपन्न !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” हुतात्मा क्रांतीवीर भाई कोतवाल ” यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचा इतिहास सर्वाँना समजावा म्हणून नाभिक समाजाला जागा भेट देवून वचन पूर्ण केले , असे कृतार्थ होत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या शुभ हस्ते नाभिक समाजाच्या सभागृहाचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी कर्जतमध्ये दहिवली – कोंदिवडे रोड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले , त्यावेळी ते बोलत होते . यावेळी नाभिक समाजाचे कर्जत तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कर्जत तालुक्यात ” श्री संत सेना महाराज व क्रांतिवीर भाई कोतवाल ” यांचे कार्य जिवंत रहावे , यासाठी तालुक्यातील नाभिक समाज आग्रही होते . मात्र त्यांची अनेक वर्षांची मागणी दुर्लक्षित होत असताना कर्जत मधील भाई कोतवाल नगर मध्ये वास्तव्यास असलेले , व बालपण घालवलेले आणि सतत क्रांती वीर भाई कोतवाल यांचे नाव मुखावर असल्याने त्यांचे देशासाठी असलेले ” महान कार्य ” भावी पिढीस जिवंत रहाण्यासाठी , तसेच सर्व समाजाप्रती त्यांच्या सामाजिक – शैक्षणिक कार्याचा आदर्श घेवून मी देखील समाजाचा या क्रांती वीरांचा देणेकरी आहे , हे सतत लक्षात ठेवून नाभिक समाजाने केलेल्या मागणीला नतमस्तक होत , येथील जागा व सभागृह बांधण्यास लागेल ती मदत करण्याचे अभिवचन उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी सर्वांना दिले.

याप्रसंगी नाभिक संघ तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे , रवींद्र देवकर – कार्याध्यक्ष रायगड जिल्हा नाभिक तरुण संघ , रघुनाथ विभाग – लवाद कमिटी उपाध्यक्ष , राकेश डगले – अध्यक्ष , कृष्णा पवार – उपाध्यक्ष , विशाल कोकरे – सचिव , गणेश गायकवाड – सहसचिव , भरत पवार – खजिनदार , रशीद खलिफा – खजिनदार , दीपक पवार , नितीन गायकवाड , रुपेश क्षीरसागर , सुनील आढाव , नंदकिशोर समिती , अर्जुन क्षिरसागर , गणेश शिंदे , शरद पवार , प्रवीण क्षीरसागर , भास्कर क्षीरसागर , बिपिन राऊत , राजेंद्र क्षीरसागर , प्रकाश राऊत , किशोर क्षिरसागर , सागर मंडलिक , दिनेश मंडलिक , अंजली शिंदे , शोभा कोरडे , गायत्री मंडलिक , दीक्षित मंडलिक , कल्पना मंडलिक , श्रावणी मंडलिक , मंगल पवार , शैला सोनावळे , रंजनी विभाग , सुरेखा क्षीरसागर , त्याचप्रमाणे असंख्य नाभिक समाजातील बांधव उपस्थित होते .यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख उत्तम शेठ कोळंबे , सत्यशोधक अभ्यासक कोळंबे सर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page