Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडसंघर्ष समिती कर्जतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फळ व पाणी...

संघर्ष समिती कर्जतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फळ व पाणी वाटप !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कुळवाडी भूषण , महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कर्जत संघर्ष समितीच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या तमाम शिव प्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक ठिकाणी फळ व पाणी वाटप करण्यात आले.
कर्जतकरांच्या न्याय हक्कासाठी तसेच समस्या सोडविण्यात अग्रेसर असणारी कर्जत संघर्ष समिती नेहमीच झटत असते . महापुरुषांच्या जयंती दिनी विविध उपक्रम करून जन माणसात आपली सामाजिक बांधिलकी जपण्याच कार्य समितीचे पदाधिकारी करत असतात , आज १९ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांनी फळ व पाणी वाटप करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.
यावेळी संघर्ष समितीचे ऍड. कैलास मोरे , सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर , विनोद पांडे , कृष्णा जाधव , जयवंत म्हसे , शिवसेवक गुप्ता , अमीर मणियार , अजय वर्धावे , सुमेश शेटे , मन्सूर बोहरी , निलेश हरिचंद्र , दिनेश सोलंकी , मल्हारी माने , प्रशांत उगले ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page