संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी देहू येथे उपस्थित…

0
19

देहूरोड : संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले संत तुकाराम महाराज शिळा मंदिर हे त्याग व वैराग्याची साक्ष आहे . ही शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा आधार असल्याचे मानतो . देहू येथील शिळा मंदिर फक्त भक्तीच्या शक्तीचे केंद्र नसून त्यामळे भारताचे सांस्कृतिक भविष्य प्रशस्त होणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले . पंतप्रधान मोदी यांना तुकाराम महाराज यांची पगडी , उपरणे आणि तुळशीचा हार देऊन वारकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला . त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांना अजित अजित पवार , संबोधित केले . उपमुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , देहू संस्थान , आळंदी संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे संत चोखामेळा तसेच त्यांच्या परिवाराने रचलेल्या सार्थ अभंग गाथेचे माझ्या हस्ते प्रकाशन करण्याचे मला सौभाग्य लाभले . या सार्थ अभंग गाथेमध्ये संत परिवाराच्या 500 पेक्षा जास्त अभंग रचनांना सोप्या भाषेत अर्थासहित सांगण्यात आले आहेत . संत तुकाराम महाराज सांगत की समाजात उच्च नीचतेचा भेदभाव करणे हे पाप आहे . त्यांचा हा उपदेश भक्तीसाठी जेवढा महत्त्वाचा आहे , तेवढाच हा उपदेश राष्ट्रभक्ती तसेच समाजभक्तीसाठी महत्त्वाचा आहे . संत तुकाराम यांचे अभंग आपल्याला उर्जा देत आहेत संत तुकाराम महाराज यांच्यातील दया , करुणा तसेच सेवा त्यांच्या अभंगांच्या रुपात आजही आपल्यासोबत आहे.या अभंगांनी आपल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे . आज देश सांस्कृतिक मूल्यांवर पुढे जात आहे.

यावेळी संत तुकाराम यांचे अभंग आपल्याला उर्जा देत आहेत . मार्ग दाखवत आहेत . संत नामदेव , संत एकनाथ , संत सावता महाराज , संत नरहरी महाराज , संत सेना महाराज , संत गोरोबाकाका , संत चोखामेळा यांच्या अभंगांमधून आपल्याला नव्यने प्रेरणा मिळते. देश आपल्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे . आपण जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहोत . याचे श्रेय संत परंपरा तसेच ऋषींना आहे.भारत ही संतांची भूमी असल्यामुळे देश शास्वत आहे . प्रत्येक युगामध्ये आपल्याकडे देश तसेच समाजाला दिशा देण्यासाठी कोणीतरी महान व्यक्ती आलेला आहे.

आज देश संत कबीरदास यांची जयंती साजरी करत आहे . संत तुकाराम यांची वाणी सर्वांसाठी प्रेरणादायी संत ज्ञानेश्वर महाराज , संत निवृत्तीनाथ महाराज , संत सोपानदेव , तसेच मुक्ताबाई या संतांच्या समाधीचे 725 वे वर्ष आहे . या महान व्यक्तींनी आपल्या शास्वततेला सुरक्षित केले . भारताला गतीशील ठेवले . छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या जीव तुकाराम महाराजांसारख्या संतानी महत्त्वाची भूमिका बजावली आहे . स्वातंत्र्यवीर सावरकांना शिक्षा झाली . तेव्हा ते तुरुंगात तुकाराम महाराजांचे अभंग गात असत . वेगवेगळा कालखंड वेगवेगळ्या व्यक्ती आहेत . मात्र या सर्वांसाठी संत तुकाराम यांची वाणी आणि उर्जा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे असे मत त्यांनी मांडले.