![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा: परभणी येथे भारतीय संविधानाचा अवमान, भीमसैनिक महिलांवरील मारहाण, आणि शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येच्या विरोधात आज (दि. 16 डिसेंबर) वंचित बहुजन युवा आघाडी, लोणावळा शहराच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 11 वाजता झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ, युवा तालुकाध्यक्ष संदीप कदम, लोणावळा शहर युवा अध्यक्ष करण भालेराव यांनी आपल्या भाषणातून या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पोलीस निरीक्षक जगताप साहेब यांना निवेदन देण्यात आले. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला आणि दोषींवर कठोर कारवाई करत त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात नागरिकांसह भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संविधानावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी, अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा, आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी, असा मागणीचा सूर यावेळी उमटला.
“जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील,” असा निर्धार व्यक्त करत, “न्याय न मिळाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.