Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसंसद भवनात या मतदार संघातील सर्वांत जास्त प्रश्न मांडून समस्या सोडवल्या -...

संसद भवनात या मतदार संघातील सर्वांत जास्त प्रश्न मांडून समस्या सोडवल्या – श्रीरंग आप्पा बारणे..

आपली कामगिरी चोख बजावून ” आप्पा बारणे यांना निवडून द्या , आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे शिवसैनिकांना आवाहन..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) मावळ लोकसभा मतदार संघ हा अस्तित्वात आल्यापासून ” शिवसेनेचा बालेकिल्ला ” राहिला आहे . या मतदार संघात आजपर्यंत ३ वेळा शिवसेनेचा उमेदवार व त्यात २ वेळा खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे निवडून आले आहेत . या मतदार संघात शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – भारतीय जनता पक्ष – मनसे – आरपीआय व इतर मित्र पक्षांची ताकद बघता व त्यांनी केलेल्या विकास कामामुळे पुन्हा एकदा ” हॅट्रिक ” साधून खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे बहुमताने निवडून येतील , यासाठी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी आपली कामगिरी चोख बजावून आप्पासाहेब बारणे यांना बहुमताने निवडून द्या , असे आवाहन कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी नेरळ येथे महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती , यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार खासदार आप्पा बारणे , आमदार महेंद्र शेठ थोरवे , शिवसेनेच्या प्रवक्त्या सोलापूर येथील ज्योतीताई वाघमारे , रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप , विजय पाटील , संदेश पाटील , मनोहर दादा थोरवे , युवा ता. प्रमुख अमर मिसाळ , उप तालुका प्रमुख दिलीप ताम्हाणे , गज्जू भाई वाघेश्र्वर ,महिला आघाडीच्या सुरेखा शितोळे , मनीषा दळवी , संघटक शिवराम बदे , नगरसेवक संकेत भासे , कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , संघटक नदीम भाई खान , नेरळ शहरातील अनेक पदाधिकारी – युवा सेना – महिला आघाडी उपस्थित होते.

यावेळी उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले की , मी गेली दहा वर्षे संसद भवनात खासदार म्हणून सर्वांत जास्त वेळा उपस्थित राहून अनेक प्रश्न मांडून या मावळ मतदार संघातील जास्तीत जास्त विकास कामे केली आहेत . यावेळी देखील पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान मोदी साहेब होतील , यासाठी धनुष्य बाणावर मत देवून मला निवडून दया , असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.

यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे यांनी ” विकास कामासाठी देत नाहीत कुठलीच कारणे , तेच आपले खासदार आप्पा बारणे , अशी त्यांच्या कामाची स्तुती करत पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक साधण्याची आजच्या या सभेत ” मुहूर्त मेढ ” रोवली गेली आहे , हे सांगत या मतदार संघात १ हजार करोड ची कामे केली जातात , यांत त्यांचा देखील पुढाकार असून म्हणूनच खासदार बारणे यांना ” संसदरत्न पुरस्कार ” मिळाले , कोणीही ओळखत नसलेले उबाठा मध्ये वाघेरे यांना तिकीट देण्यापेक्षा एका साध्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची गरज होती , म्हणून यांना भगेरे करून पाठवून दया , अशी टिका देखील त्यांनी केली . मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य निधीतून आपण अनेकांचे जीव वाचवले गेले आहेत , संविधान बदलणार असा आरोप केला जातो , पण बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान कोणीच बदलू शकत नाही , उलट या काँग्रेसनेच खूप वेळा संविधान बदलले आहे , आणीबाणी झाली तेंव्हा तर बाळासाहेब म्हणाले होते माझी शिवसेना काँग्रेसमय करणार नाही , पण आता ऊबाठा काँग्रसमय झाली आहे.
माकडाच्या हातात सत्तेची सूत्र राजाने देवून त्या माकडानेच राजाचा नाक कापला आहे , असे संजय राऊत यांच्यावर कडक शब्दात त्यांनी ताशेरे ओढले . यांची घराणेशाही धोक्यात आली की , संविधान धोक्यात आहे , अशी आरोळी ठोकली जाते , असे घणाघाती मत त्यांनी व्यक्त केले.

तर जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांनी या कर्जत खालापूर मतदार संघातील ३८५ मतदार बूथ वर कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी विकास कामे केली असल्याने येथे शिवसेना व धनुष्य बाण १ नंबर वर असल्याचे सांगितले . यावेळी नेरळ , कडाव येथील अनेकांचा पक्ष प्रवेश सहारा कोळंबे यांच्या सहकार्याने झाला .
- Advertisment -

You cannot copy content of this page