सत्यानंद तीर्थ धाम सत्संगाचे येत्या रविवारी ऑनलाईन प्रक्षेपण होणार..

0
26

लोणावळा : सत्यानंद तिर्थ धाम लोणावळा येथे दर रविवारी होणारा सत्संग दि 23/1/2022 रोजी थेट ऑनलाईन प्रक्षेपित होणार आहे.

लोणावळा भंगरवाडी येथे सद्गुरू ईश्वरदास महाराज भक्ती सत्संग ट्रष्ट यांच्या मार्फत मागील नोव्हेंबर 2021 पासून लोणावळा व परिसरातील नागरीकांसाठी दर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत भक्ती सत्संग आयोजित करण्यात येत होता, त्यानंतर सर्व सहभागी नागरिकांना महाप्रसाद दिला जात होता या सत्संगात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत होते.

परंतु ओमीयोक्रॉन व कोरोना चा प्रादुर्भाव पाहता दि.23 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता भक्ती सत्संगाचे ऑनलाईन प्रक्षेपण होणार असल्याचे ट्रस्टचे प्रमूख गुरुजी विजेंद्रजी महाराज यांनी सांगितले आहे.

स्थानिक टी व्ही चॅनलवर ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे याचा लाभ भाविकांनी घ्यावा. ट्रस्टच्या you tube चॅनलवर ऑनलाईन सत्संग उपलब्द आहेत. तरी संबधीत भाविकांनी you tube चॅनलवर सत्संग बघावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

भविष्यात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेता कोरोनाचे नियम पाळून व सामाजिक अंतर राखून निम्या आसन व्यवस्थेनुसार कोरोनाच्या दोन लस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश देऊन सत्संग सुरू करण्याचे नियोजन आहे.असे मत गुरुजींनी व्यक्त केले आहे.