सशस्त्र दरोड्यातील सराईत आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक !

0
55

शिरगांव : शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी दि . 20 रोजी अटक केली आहे.

विशाल वसुदेव सोनवणे ( वय 22 , रा . कासारसाई , ता . मुळशी ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून सदर आरोपी हा हिंजवडी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरगाव चौकीत दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.याप्रकरणातील आरोपी कासारसाई धरणाजवळ आला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस नाईक आशिष बोटके यांना मिळाली. पोलिसांनी बुधवार दि.20 रोजी कासारसाई धरणाजवळ सापळा लावून विशाल सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत सशस्त्र दरोड्याचा गुन्हा केल्याचे कबूल केले . त्याची अधिक चौकशी केली असता आरोपी विशाल हा हिंजवडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुढील कारवाईसाठी त्याला शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास शिरगांव पोलीस करत आहेत.