Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगड" सागरभाऊ शेळके श्री २०२२ " चा मानकरी ठरला फिटनेस फस्ट जीमचा...

” सागरभाऊ शेळके श्री २०२२ ” चा मानकरी ठरला फिटनेस फस्ट जीमचा सुमित गायकर !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राजकीय जाणता राजा आदरणीय ” श्री शरदचंद्रजी पवार साहेब ” यांच्या १२ डिसेंबर २०२२ वाढदिवसानिमित्त कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवशाही युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ” सागरभाऊ शेळके श्री २०२२ ” शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन प्रतिक्षा फार्म व लॉन्स – डीकसळ , ता.कर्जत येथे करण्यात आले होते.
अतिशय दिमाखदार पद्धतीने व तरुणांच्या उत्साही वातावरणात हि स्पर्धा संपन्न झाली . या स्पर्धेचे उदघाटन कर्जत खालापूर मतदार संघाचे लोकनेते माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या हस्ते झाले , उदघाटनप्रसंगी ते म्हणाले की , कर्जत तालुका हा खेळाडूंची खाण असलेला तालुका आहे . मैदानी खेळांची व ऐन तरुण वयात चुकीच्या मार्गावर न जाण्यासाठी तरुणांच्या हितासाठी ध्यास घेतलेले सागरभाऊ शेळके यांचे असे कार्यक्रम तरुणांसाठी खूपच मोलाचे असून या दुसऱ्या वर्षात ही त्यांनी खूपच चांगले आयोजन केले असून राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व सागरभाऊ शेळके यांची वाहवा माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी केली.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार सुरेशभाऊ लाड , राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मा. मेहबूब भाई शेख , राष्ट्रवादी युवक रायगड जिल्हाध्यक्ष अंकित साखरे , मनसे रायगड ज़िल्हाध्यक्ष जितेंद्रदादा पाटील , रा.जि.प. माजी उपाध्यक्ष सुधाकरशेठ घारे , विध्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रसाद कर्णूक , शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत ,शिवसेनेचे जेष्ठ नेते भरत भाई भगत , कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भगवानशेठ चंचे , शिवसेना तालुका प्रमुख उत्तमदादा कोळंबे , राष्ट्रवादी कर्जत ता. महिला अध्यक्ष ऍड.रंजना धुळे , माजी नगराध्यक्ष तथा गटनेते शरदभाऊ लाड , कर्जत शहराध्यक्ष रणजितशेठ जैन , कर्जत शहर कार्याध्यक्ष राजेशदादा लाड , नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड , माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत , शिवसेना उपतालुका प्रमुख दशरथ दादा भगत , आर.के.कोळंबे , सरपंच रमेश लदगे , उपसरपंच तानाजी टोकरे , सदस्य रुपेश कोंडे , भास्कर लोंगले , तेजस भासे , दिनकर तळपे , उपसरपंच प्रसाद भासे , मालू निरगुडे , महेंद्र बडेकर , युवक विध्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष अर्केश काळोखे , राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी – नोमान नजे , वीरेंद्र जाधव ,भूषण पेमारे ,राजू हजारे , जय बोराडे , शाहनवाज पानसरे , जितू कारताडे , भाऊ लदगे , मनोहर कांबरी , संदीप पाटील , अमर पाटील , श्याम पाटील , जगदीश ठाकरे , समीर साळोखे , योगेश घोलप , शैलेश देशमुख , हरिश्चंद्र निरगुडा , भूषण पेमारे , विरेंद्र जाधव , धनाजी गरुड , गिरी साहेब , ऋषिकेश राणे , जे के कोळंबे , उत्तम पालांडे , जहीर खान , आरपीआय ता . कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड , निलेश बडेकर , आदी मान्यवर उपस्थित होते . याप्रसंगी कर्जत तालुक्यातील विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
पॉवरलिफ्टिंग मध्ये कुमारी अमृता ज्ञानेश्वर भगत , प्रो कबड्डी मध्ये निवड झालेला सुयोग बबन गायकर , भारतीय सैन्य दलात भरती – राज गोविंद घरत , ढोलकी वादनांत विशेष कामगिरी करणारा रोहित सचिन लोंगले , आंतरराष्ट्रीय खेळाडू चार वेळा नॅशनल अवार्ड रग्बी नीता राठोड यांचे प्रशिक्षक पवार सर यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी ” सागरभाऊ शेळके श्री २०२२ ” चा मानकरी ठरला फिटनेस फस्ट जीम चा ” सुमित गायकर ” यांस रोख ११ हजार – आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . तर बेस्ट इमरोव्हमेन्ट योगेश बारसे , बेस्ट पोझर सुमित सुर्वे तर ५५ कि. प्रथम क्रमांक – नरेश चव्हाण , ६० कि. योगेश बारसे , ६५ कि. सुमित सुर्वे ,७० कि. राहुल थोरवे , ७५ कि. सुमित गायकर यांना रोख पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी – प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी हि रोमांचकारी शरीर सौष्ठव स्पर्धा बघण्यासाठी तालुक्यातील अनेक तरुण बॉडी बिल्डर प्रेमी उपस्थित होते .

You cannot copy content of this page