साते गावचे सरपंच विठ्ठल मोहिते यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान…

0
73

मावळ : साते गावचे सरपंच विठ्ठल भगवान मोहिते यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले.

गणेश क्रीडा मंच स्वारगेट येथे नुकत्याच आयोजित सन्मान सोहळ्यात साते गावचे सरपंच विठ्ठल मोहिते यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मुख्य अधिकारी आयुष प्रसाद, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रणजित शिवतारे, सभापती कृषी व पशुसर्वधन जिल्हा परिषद बाबुराव आप्पा वायकर, सभापती बांधकाम, आरोग्य विभाग प्रमोद काकडे, सभापती महिला बालकल्याण पूजा पारघी, सभापती समाजकल्याण सारिका पानसरे यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे सन्मानित करण्यात आले.


साते गांवचे सरपंच विठ्ठल मोहिते यांनी ग्रामपंचायती च्या माध्यमातून विविध योजनांच्या साह्याने सर्वसामान्य जनतेच्या विविध विकास कामे केले आहेत.सरपंच विठ्ठल मोहिते यांनी गावामध्ये विकासात्मक कामे करण्यावर भर दिलेला आहे त्याचप्रमाणे कोरोनाचा कालखंडामध्ये जनजागृती, लसीकरण मोहीम विशेष मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली त्याच पद्धतीने गावांमध्ये सिमेंट रस्ते करण्यावर भर दिला, आदर्श स्मशानभूमी ग्रामपंचायत कडून करण्यात आली.


यावेळी सरपंच विठ्ठल मोहिते यांनी अष्ट दिशा न्यूज प्रतिनिधिशी बोलताना सांगितले की,गावामध्ये विकासात्मक कामे करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचे मार्गदर्शन वेळोवेळी सूचना मिळाल्या त्यामुळेच इथपर्यंत पोहोचलो आहे.विविध योजनांची माहिती नागरीकांपर्यंत पोहचवून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला.गावातील प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहिलो माझ्या आत्तापर्यंतच्या कामाची पोच पावती आज मला या पुरस्कारा रूपात मिळाली आहे. तसेच मी यापुढेही गावातील नागरिकांना शासकीय योजना पुरवून आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच विठ्ठल मोहिते यांनी सांगितले आहे.

सदर सन्मान सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील आमदार, खासदार,जिल्हा परिषद सदस्य, आजी/ माजी सरपंच, उपसरपंच, अधिकारी, आशा वर्कर, साते गावातील नागरीक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.