साधू वासवानी आश्रम खंडाळा येथे मोफत आरोग्य शिबिराचे 6 मार्च रोजी आयोजन !

0
312

लोणावळा : साधू वासवानी आश्रम , खंडाळा रोग निवारण केंद्र येथे मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन रविवार दि.6 रोजी करण्यात आले आहे.

सदर शिबिरात चालल्यानंतर दम लागणे , घाम फुटणे , चक्कर येणे , छातीमध्ये दुखणे , वाढलेला रक्तदाब , मधुमेह , अशक्तपणा , लठ्ठपणा इत्यादी तक्रारींवर हृदयरोग तज्ञ डॉक्टरांकडून तसेच स्त्री रोगांच्या संबंधीत असणाऱ्या तक्रारी म्हणजेच स्त्रियांचे व मुलींचे रक्त कमी असणे ( अॅनिमिया ) , कंबरदुखी , मासिकपाळीच्या तक्रारी , अती रक्तस्त्राव होणे , अंगावर पांढरे जाणे , अंग बाहेर येणे , वंध्यत्व ( मुले न होणे ) इत्यादी व्याधींवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.40 वयोगटापुढील सर्व स्त्रियांनी ( Pap Smear ) ही तपासणी आवश्य करून घ्यावी .

त्याचबरोबर बालरोगाच्या संबंधीत तक्रारी भुक न लागणे , जंत होणे , पोटदुखी , झोपेत लघवी करणे ( मूत्रशय्या ) , शरीराची वाढ व्यवस्थित न होणे PEM ( Protein Energy Malnutrition ) , दात खाणे , सर्दी – खोकला इत्यादी तक्रारींवर बालरोग तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन मोफत करण्यात येणार असून ई.सी.जी., ब्लडशुगर ( रॅण्डम ) , हिमोग्लोबिन आणि Pap Smear तपासणी मोफत केली जाईल .

तरी सर्व गरजूंनी रविवार , दि . 6 मार्च 2022 रोजी, सकाळी 9:00 ते दुपारी 12:00 यावेळेत , साधु वासवाणी आश्रम , खंडाळा येथील दवाखान्यात उपस्थित राहून या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन साधू वासवानी आश्रम कडून करण्यात आले आहे.

तसेच या शिबिरात ज्या रुग्णांना आवश्यक असल्यास 2 डी – इको ( 2D – ECHO ) , स्ट्रेस टेस्ट ( Stress Test ) ची तपासणी , ॲन्जीओग्राफी ( Angiography ) शस्त्रक्रिया करावयाची असल्यास इनलॅक्स व बुधराणी हॉस्पिटल , पुणे येथे सवलतीच्या दरात केली जाईल. तरीही शिबिरात तपासणी केलेल्या पेशंटसाठी ही सवलत शिबिरानंतर फक्त 15 दिवसांसाठीच राहील याची नोंद घ्यावी.या सवलतींचा गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.