भिसेगाव – कर्जत (सुभाष सोनावणे) आंतराष्ट्रीय मानवअधिकार राजदूत संघटना , पोलीस मित्र पत्रकार समिती यांच्या कडून दर वर्षी सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांस शाबासकीची थाप म्हणून ” महाराष्ट्र रत्न पुरस्कार ” देऊन सम्मान करतात. या वर्षीचा हा पुरस्कार कर्जत तालुक्यातील तांबस गावातील सुपुत्र , सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे मा. श्री. अनिल मधुकर जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात आले .यावेळी महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक अधिकारी वर्ग उपस्थित होते.
त्याचप्रमाणे आंतराष्ट्रीय मानवअधिकार राजदूत संघटना , पोलीस मित्र पत्रकार समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागील कित्येक वर्ष अनिल जाधव हे सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या या सामाजिक क्षेत्रातील योगदानामुळे त्याना हा पुरस्कार देण्यात आला. कोरोना महामारी काळात त्यांनी अनेक गरीब – गरजू कुटुंबांना अन्न धान्य देऊन मदतीचा माणुसकीचा हात दिला होता.शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे भरीव कार्य आहे.
त्यांना देण्यात आलेल्या या ” महाराष्ट्र रत्न पुरस्कारामुळे ” रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्याबरोबरच त्यांचे तांबस गावाचे नाव रोशन झाले असून त्यांच्या गावात आनंदाचे वातावरण आहे.याआधी सुद्धा अनिल जाधव यांना सामाजिक कामाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत.त्यांना ” महाराष्ट्र रत्न ” पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल राजकीय – सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून शुभेच्छा दिल्या आहेत.