सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्र.13 जागा वाटपाबाबत लोणावळा नगरपरिषदेत हरकत दाखल..

0
814

लोणावळा दि.16 : लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी प्रभाग क्र.13 च्या सर्व साधारण जागांबाबत लोणावळा नगरपरिषदे मध्ये हरकत नोंदविण्यात आली आहे.

भुशी, रामनगर, हनुमान टेकडी हा वार्ड अनुसूचित जाती मागास वार्ड म्हणून जाहीर असून आता हा प्रभाग झाल्याने काही वार्ड यामध्ये जोडले गेले आहेत. आणि त्या कारणामुळे आम्हाला तीनही जागा या सर्वसाधारण करण्यात आल्या असेल तर हा आमच्यावर जाणून बुजून केलेला अन्याय आहे. आणि या जागा वाटापा बद्दल आम्हाला आक्षेप असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच या जागा कुठल्या आधारे जाहीर केलेल्या आहेत,हे आम्हाला लेखी स्वरूपात देण्यात यावे अन्यथा हा जोर जबरदस्तीचा कारोबार थांबवावा आणि या जागा वाटपाचा पुनरवीचार करावा आणि निर्णय द्यावा अशी मागणी या निवेदना मार्फत करण्यात आली आहे.

सदर बाबत लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांना निवेदन देताना सुनील बेंगळे, राज मोरे, प्रदीप कांबळे, विशाल रोकडे, प्रमोद कांबळे, जितेंद्र रोकडे, विजय रोकडे आदी जन उपस्थित होते.