सिंहगड इन्स्टिटयूट व आय आर बी विरोधात कायदेशीर कठोर कारवाई करणार… कुसगांव ग्रामपंचायत !

0
228

कुसगाव : सिंहगड इन्स्टिट्यूट आणि आय आर बीच्या कर थकबाकी विरोधात कुसगांव ग्रामपंचायतचा कठोर कायदेशीर कारवाई चा इशारा.

मागील 11 ते 12 वर्षापासून सिंहगड इन्स्टिटयूट व आय अर बी कंपनीने थकीत कर न भरल्याने कठोर कारवाईचा इशारा सरपंच अश्विनी गुंड , उपसरपंच सूरज केदारी आणि ग्रामसेवक भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

कुसगाव ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपसरपंच सूरज केदारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की 40 ते 45 हजार लोकसंख्या असणाऱ्या आणि लोणावळ्याला लागूनच असणाऱ्या आमच्या ग्रामपंचायत हद्दीत सिंहगड इन्स्टिट्यूट असून हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत , या संस्थेत असणाऱ्या आणि शिक्षणासाठी वापर होत असलेल्या अनेक मिळकतीला ग्रामपंचायतीने करमुक्त केल्या आहेत,परंतु काही व्यावसायिक मिळकती आहेत ज्यात हॉस्टेल , मेस , रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून संस्था लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे त्या मिळकतीवर संस्थेने कर भरणे आवश्यक असताना आणि ग्रामपंचायतीने यासाठी वारंवार पत्रव्यवहार , पाठपुरावा करून देखील सिंहगड इन्स्टिट्यूट व आय आर बी कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.

म्हणून या पत्रकार परिषदेचे आयोजन केले असल्याचे केदारी यांनी सांगितले.जवळ जवळ 2012 पासून म्हणजेच मागील 10 ते 12 वर्षाचा कर अंदाजित 60 ते 65 लाख संस्थेकडे थकबाकी असल्याने कुसगाव ग्रामपंचायतीच्या विकास कामांना ब्रेक लागत आहे . सिंहगड इन्स्टिट्यूट ही शिक्षण संस्था असल्याने तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ग्रामपंचायत कोणतीही कारवाई करत नव्हती परंतु संस्थेला वारंवार पाठपुरावा करून देखील संस्था कर भरत नसेल तर नाईलाजास्तव कठोर कारवाई करावी लागेल असे पत्रकार परिषदेत ग्रामसेवक , सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले .

गावाच्या विकासाला बाधा ठरणाऱ्या सिंहगड इन्स्टिट्यूट आणि ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या आय आर बी यांनी सी एस आरच्या माध्यमातून देखील काही मदत होत नसेल तर कायदेशीर कारवाई ग्रामपंचायत नक्कीच करेल . आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुक्सानासाठी सर्वस्वी आणि पूर्णतः संस्थाच जबाबदार असेल असे पत्रकार परिषदेत ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.