Saturday, September 21, 2024
Homeपुणेलोणावळासिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, लोणावळा येथे “करिअर नियोजन आणि करिअर तयारी”...

सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, लोणावळा येथे “करिअर नियोजन आणि करिअर तयारी” विषयावर कार्यशाळा आयोजित..

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, लोणावळा येथील प्रशिक्षण आणि प्लेसमेंट युनिटतर्फे 28 व 29 सप्टेंबर 2024 रोजी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “करिअर तयारी आणि उद्योग क्षेत्रातील तयारी” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर व्याख्याने घेण्यात आली. उच्च शिक्षण तसेच उद्योग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत गुणात्मक कौशल्ये, गट संवाद, मुलाखतीच्या विविध पद्धती यांची माहिती दिली गेली. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी लागणारी कौशल्ये, शिष्यवृत्ती आणि प्रवेश प्रक्रियेची माहितीही दिली गेली. या सत्राच्या प्रमुख अतिथी म्हणून “प्लॅटफार्मा स्किलिंग अँड करिअर” अकादमीच्या संस्थापक आणि पार्टनर वक्त्या डॉ. अनुभा खळे आणि श्रीमती गीता श्रीनिवासन उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टीपीओ अधिकारी ए.के. शेलार आणि अनुषा इचनूर यांनी प्राचार्य डॉ. आर.आर. पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
- Advertisment -

You cannot copy content of this page