सिग्नेचर डिजायर संकुल हालीवली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी !

0
26

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायत हद्दीत सिग्नेचर डिजायर या संकुलाच्या विद्यमाने विश्वरत्न – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती सर्वांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.आगळ्या वेगळ्या पद्धतीने दोन दिवसीय भीम जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. विश्वरत्न – भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्धधम्माची महंती सर्व बहुजन समाजास समजणे , हि आज काळाची गरज आहे.

या उद्देशाने आयोजकांनी पूजनीय भंते संघरत्न यांना आमंत्रित करून दि .१३ एप्रिल च्या मध्यरात्री महापरीत्रान सूत्तपठन कार्यक्रम आयोजीत केले होता तसेच १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता हालीवली ग्रामपंचायती च्या विद्यमान आदर्श सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे व तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश बोराडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

तर संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत उपासिका माधुरीताई भालेराव यांचे व्याख्यान आयोजित केले होते , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती समजणे का आवश्यक आहे ? या विषयावर त्यांनी उपस्थितांना सुरेख मार्गदर्शन केले.

या जयंती उत्सव कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक उमेश गायकवाड , हालीवली ग्रामपंचायती च्या आदर्श सरपंच सौ . प्रमिला सुरेश बोराडे , हालीवली तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश बोराडे , उपसरपंच केतन बोराडे , धम्मकाया फाऊंडेशन या धार्मिक संस्थेचे कोकण प्रदेश अध्यक्ष उपासक सुमित भालेराव ,भारतीय बौद्ध महसभा कर्जत तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड , किरवली गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड , मयुर बडेकर , संभाजी ब्रिगेडचे कर्जत तालुका अध्यक्ष आकाश कांबळे , उपासक प्रवीण पंडित , अल्पेश मोरे ,हालीवली गावचे माजी उपसपंच रमेश दिनकर , विजय हांडे , मनोहर शिंदे , मल्लिकार्जुन गुंडरे, कडाव ग्रुप ग्राम पंचायतीचे माजी सदस्य अमर शिंदे , देविदास जाधव ,राजेश गायकवाड , प्रवीण गायकवाड आदी तर पंचक्रोशीतील बहुजन समाजाचे मान्यवर , आंबेडकर अनुयायी , महिला वर्ग , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपासक संतोष सुरवसे यांनी केले, या कार्यक्रमाचे आयोजक गणेश गायकवाड,

अंकुश सुरवसे ( बहुजन युथ पँथर रायगड जिल्हा सचिव ), शशिकांत उबाळे,रमेश लादे, गौरव वानखेडे, विजय कांबळे, विशाल तांबे, विनोद सोनावणे,राम माने,गोरख सुरवसे, यांनी केले होते. फटाक्यांची आतिषबाजी , जयघोषात मोठया उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती प्रथमच सिग्नेचर डिजायर – हालीवली येथे साजरी झाली.