सिद्धार्थ नगर येथील पाईपलाईन चे रंधगाळत सुरु असलेल्या कामामुळे स्थानिकांना अडचणी…

0
144

लोणावळा : सिद्धार्थ नगर येथील ड्रेनेज पाईपलाईनचे काम करण्यासाठी नगरपरिषदेने रस्ता खोदला आहे. हे काम वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे तेथील रहिवाशी यांना अडचणींचा सामाना करावा लागत असल्याचे मत येथील रहिवाशी व्यक्त करत आहेत.

मागील 21 ते 22 जानेवारी पासून येथील ड्रेनेज पाईपलाईनचे काम सुरु करण्यात आले आहे. तेव्हापासून फक्त ठेकेदाराचे कामगार काम करत आहेत त्याकडे प्रशासकीय इंजिनिअर, मुकादम यांपैकी कोणीही या कामाची पाहणी करत नसल्यामुळे कामगार अगदी संथ गतीने हे काम करत आहेत. येथे लोकवस्ती असून वृद्ध, तरुण, लहान मुले व महिलांना वरदळीसाठी अडचण निर्माण होत आहे, तसेच ड्रेनेज लाईनच्या खाळोखालच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन असल्याने येथील नागरिकांना पुढील भविष्यात आरोग्यासाठी धोका निर्माण होणार असून येथील नागरिकांकडून त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. व प्रशासनाने पाण्याची लाईन बाजूने टाकून लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी विनंती येथील सामाजिक कार्यकर्ते नितेश जाधव यांनी केली आहे.

मागील महिन्यात याबाबतचा लेखी अर्ज नगरपरिषदेला देण्यात आला असून त्यासंदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याचे मत तेथील नागरिकांनी व्यक्त केले आहे.