सी.सी.टी.व्ही ठरतोय कर्जत रेल्वे पोलिसांचा तिसरा डोळा !

0
225
भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे होत आहेत.मोबाईल ही छोटीशी वस्तू जरी असली तरी आजच्या युगात खूप किमंती चीज आहे.म्हणूनच या गुन्ह्यात बारकाईने लक्ष घालून गुन्हा उघडकीस आणण्यास आपले कसब पणाला लावावे लागते ,व यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत जणू रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या जवानांना तिसरा डोळ्याचे काम करत आहे.
कर्जत रेल्वे पोलीस ठाणे गु.र.नं ८१/२०२१ कलम ३७९ भादवि या गुन्ह्याचा तपास करीत असताना, गुन्हा घडलेली तारीख १८ जानेवारी २०२१ रोजीचे कर्जत रेल्वे स्टेशन येथील फलाट क्रं ०२ वर गुन्हा घडलेल्या वेळेचे ट्रेनच्या सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता, सदर सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल फोन एक इसम अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व नेसणीस निळ्या रंगाची पँट तसेच खांद्यावर सॅकबॅग अडकवलेला चोरी करून घेऊन जात असल्याचे दिसुन आले.
तेव्हा सदर इसमाचा खास खबरीमार्फत शोध घेतला असता, सदर वर्णनाचा एक इसम बदलापुर रेल्वे स्टेशन (प) बाजुला येणार असल्याचे समजल्याने, पोलीस हवालदार मकरंद रेडकर व पोलीस शिपाई समिर पठाण, हे बदलापुर रेल्वे स्टेशन (प) येथे जाऊन, त्याचा शोध घेतला असता त्या व्यक्तीचे नाव प्रद्युमन ओम प्रकाश गिरी, वय २२ वर्ष, राह – सध्या रूम नं ०५, ओम साई चाळ, नांदप, टिटवाळा, ठाणे कायमचा पत्ता :- ३०, अर्जुनपुर, ता. बहरीपुर कला, जि. जौनपुर, उत्तरप्रदेश, हा मिळुन आला, तेव्हा त्या सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला खालील वर्णनाचा मोबाईल फोन जप्त करून त्यास अटक करण्यात आले आहे.

एकुण ७.०००/- रु. कि.चा सिल्व्हर रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे.एव्हढ्या प्रवाशी वर्गातून नेमका इच्छित गुन्हेगार शोधणे , हे खरोखरच कौतुकास्पद असून , गुन्हेगाराचा मागोवा घेऊन खबरी मार्फत तो कुठे रहातो , हे शोधणे म्हणजे देखील डोंगर फोडून उंदीर शोधण्यासारखे कसब असल्याने कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संभाजी यादव यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली पोलीस जवानांनी हे साध्य करून दाखविले , व मुद्देमाल परत फिर्यादीस दिले , या उल्लेखनीय कामगिरी बजावली म्हणून सर्व पोलीस जवानांचे कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संभाजी यादव यांनी कौतुक करून शाबासकी दिली आहे.