Friday, December 8, 2023
Homeपुणेलोणावळासुर साधना गायन क्लासेस च्या नवोदित कलाकारांनी केले प्रेक्षकांना मंत्रमुग्ध…

सुर साधना गायन क्लासेस च्या नवोदित कलाकारांनी केले प्रेक्षकांना मंत्रमुग्ध…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यात नव्याने सुरु झालेल्या सूर साधना गायन क्लासेसने अल्पकालावधीतच प्रसिद्धी मिळवली आहे. मुख्यत: या क्लासेस मधून गाणे शिकण्यासाठी जेष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग आहे. अतिशय अल्प शुल्क घेऊन हौशी कलाकारांना गायनाचे प्रशिक्षण लोणावळ्यातील विरंगुळा केंद्रात दिले जाते.
नुकताच क्लासेसच्या नवोदित कलकारांचा “ओल्ड इज गोल्ड” हा जुन्या गीतांवर आधारित कार्यक्रम लोणावळ्यातील महिला मंडळ हॉल मध्ये पार पडला. यामध्ये किशोर कुमार आशा, लता दीदीच्या गाजलेल्या गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
सुर साधना गायन क्लासेस चे संचालक प्रदीप वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळ्यातील अनेक हौशी कलाकारांना रंगमंचावर सादरीकरण करण्याची संधी मिळत आहे.ओल्ड इज गोल्ड गाण्याच्या दुसऱ्या पर्वच्या कार्यक्रमात मंगला राणे, दीपाली कांबळे, रेखा दाभाडे, अश्विनी कडूसकर संध्या होजगे, व प्रदीप वाडेकर यांनी गीतांचे सादरीकरण केले तर निवेदन मानसी वाडेकर हिने केले.
यावेळी कार्यक्रमास लोणावळ्याच्या माजी नगरध्यक्षा सुरेखा जाधव, माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, माजी उपनगराध्यक्षा सिंधू कवीश्वर, लोणावळा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा उमा मेहता, माजी नगरसेवक संजय गायकवाड, जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, जेष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर, मावळ वार्ता फाउंडेशनचे नवीन भुरट, अनिल गायकवाड, गणेश गवळी, राजेश मेहता, सुरेश गायकवाड, ऍड. रजपूत, गौरी कडू, मीनाक्षी गायकवाड यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्तित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवोदित कलाकारांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
सादरीकरण पाहताना सर्व नवोदित कलाकार पहिल्यांदा गात आहेत असे वाटलेच नाही. असे कौतुक माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा यांनी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page