सोमाटणे येथील टोल नाका हटाव,,, सर्वपक्षीय जन आंदोलन संपन्न…

0
152

तळेगाव दि.16 : सर्व पक्षीय टोल हटाव कृती समितीच्या वतीने सोमाटणे टोलनाका हटविणेबाबत आज तळेगाव दाभाडे येथील लिंबफाटा ते सोमाटणे टोलनाक्या पर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला . कडक उन असुनही या मोर्चास प्रचंड प्रतिसाद मिळाला .तसेच सदर मोर्चात महिलांची उपस्थिती लाक्षणीय होती.

सदर मोर्चा सोमाटणे टोलनाक्या पासुन साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर पोलीसांनी अडविला.यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे , माजी राज्यमंत्री बाळा भेगडे , किशोर आवारे , गणेश भेगडे , गणेश खांडगे , रविंद्र भेगडे , यादवेंद्र खळदे , रुपेश म्हाळसकर , संतोष कदम , गणेश काकडे यांनी मनोगत व्यक्त केले . आयआरबी बेकायदा वसुली करीत असून यापुढे मावळवासियांनी टोल भरु नये , येत्या १० मे पर्यंत सोमाटणे टोल नाका बंद झाला नाहीतर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सर्वपक्षीय टोल हटाव कृती समितीच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.