सोशल मीडियावर बदनामीच्या पडसादातून आणखी एका 21 वर्षीय तरुणाचा बळी…

0
651

पौड : सोशल मीडियावरील बदनामीला कंटाळून मुळशीतील 21 वर्षीय कबड्डीपटूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सुतारदरा , कोथरूड येथे घडली. सोशल मिडियावर झालेली फसवणूक गळ्याशी आल्याने कुमार शिंदे या उत्कृष्ट कबड्डी खेळाडूने जीवावर उदार होऊन आपला जीवन प्रवास संपवला आहे.

कुमार अंकुश शिंदे ( वय 21 , कायम रा.वांद्रे , ता . मुळशी , सध्या रा . सुतारदरा , कोथरूड , पुणे ) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , मुळशी तालुक्यातील धरण भागातील ग्रुप ग्रामपंचायत वांद्रे गावातील सामाजिक कार्यकर्ते अंकुश शिंदे यांचे चिरंजीव व श्री. बालाजी प्रतिष्ठान कबड्डी संघ कोथरूड संघातील कबड्डीपट्टू उत्कृष्ट उजवा रक्षक खेळाडू कुमार अंकुश शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदरा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आपला जीवन प्रवास संपवीला.सोशल मिडियावर झालेली बदनामी व आर्थिक मागणीला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले आहे . कुमार शिंदे यांना काही दिवसांपूर्वी सोशल मिडिया वरून एक मेसेज आलेला होता आणि या मेसेज वरून बदनामी करण्यात आली होती . आणि या बदनामी करण्यात आलेल्या अज्ञात व्यक्तीने रोख रक्कमेची देखील मागणी केल्याचे समजत असून कुमार याने मित्र परिवार नातेवाईक यांच्याकडे हात उसने पैसे मागणे सुरू केले होते . परंतु शिंदे याच्या प्रयत्नांना यश आले नाही. काही नातेवाईक आणि मित्र मंडळी यांनी थोडीफार आर्थिक मदत सुद्धा केली होती.परंतु सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या व्यक्तीला शिंदे हे अपुरे पडले होते.

मुलांनी आपल्या बाबतीत अशा नकळत घडलेल्या घटनेची घरी पालकांशी संवाद करून पोलिसांची मदत घेऊन मार्ग काढला पाहिजे . मुलांचा आणि पालकांचा संवाद कमी झाल्याने मुलांचे घरा बाहेरील वाद वाढले आहेत याकडे पालकांनी सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे . या धक्कादायक घटनेनंतर तरी पोलिसांच्या हाती तो सोशल मिडियावर बदनामी करणारी व्यक्ती किंवा ती टोळी गजाआड होईल का ? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे . कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत.