Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडस्वतःच्या ताकदीवर विश्व निर्माण करणारा महेंद्र..

स्वतःच्या ताकदीवर विश्व निर्माण करणारा महेंद्र..

मी तुमच्या पाठीशी आहे , ६० हजार मताधिक्याने निवडून आणणार – पालकमंत्री उदय सामंत..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) एक व्यक्ती सर्व पक्ष फोडू शकतो , हे ऐकल्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही , मात्र कर्जत खालापूर मतदार संघाचे ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी हे करून दाखवले आहे , म्हणूनच तर स्वतःच्या ताकदीवर ” विश्व ” निर्माण करणारा ” महेंद्र ” , असा उल्लेख करत रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ” मी तुमच्या पाठीशी आहे , ६० हजार मताधिक्याने निवडून आणणार , अशी ” भीष्म गर्जना ” रविवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ रोजी शिवतीर्थ – पोसरी – कर्जत येथे अनेक पक्षातील मात्तब्बर – दिग्गज नेत्यांचा व पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश सोहळ्यात त्यांनी केली.

यावेळी व्यासपीठावर पालक मंत्री उदय सामंत , मावळ खासदार श्रीरंग आप्पा बारणे , आमदार भरत शेठ गोगावले , आमदार महेंद्र शेठ दळवी , कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे , डॉ. शिल्पाताई देशमुख – शिवसेना – उपनेत्या , जिल्हाप्रमुख – संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , संघटक – विजय पाटील , ता. प्रमुख संभाजी जगताप , संदेश पाटील , रेश्मा म्हात्रे – महिला तालुका प्रमुख कर्जत , सौ. रेश्मा आंग्रे , अमर मिसाळ , रोहित विचारे , सुरेखा शितोळे , प्रसाद थोरवे , संकेत भासे , अभिषेक सुर्वे , नदीम भाई खान , दिनेश कडू , त्याचप्रमाणे शिवसेना – युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , शिवसेना ( उबाठा ) , शेतकरी कामगार पक्ष , आम आदमी पार्टी , व मनसे , पक्षाला खिंडार पाडून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा ” करिश्मा ” दिसला . यांत दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढलेले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री. हनुमानशेठ पिंगळे , अक्षय सोनू पिंगळे – मा. पंचायत समिती सदस्य , विश्वनाथ पाटील – मा. सभापती खालापूर पंचायत समिती , एच.आर. पाटील – मा. सभापती खालापूर पंचायत समिती , निखील पाटील – युवासेना रायगड जिल्हा चिटणीस , महेश पाटील – शाखाप्रमुख खरीवली , भाऊ बाळू पवार – सरपंच बीड ग्रामपंचायत खालापूर , सौ नम्रता राकेश कर्णुक पाटील – उपसरपंच बीड ग्रामपंचायत , सौ.लक्ष्मी हरिभाऊ पवार – सदस्य बीड ग्रामपंचायत , सुनील दिसले व अक्षय दिसले – उबाठा गटाचे कार्यकर्ते , राकेश देशमुख – सरपंच नारंगी ग्रामपंचायत , उध्दव देशमुख – नारंगी ग्रामपंचायत , शेखर जांभळे – जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी रायगड , प्रवीण गायकवाड – शेकाप सामाजिक कार्यकर्ते , अरुण गायकवाड – अखिल कामगार संघटना समन्वयक उबाठा , सिराज जळगावकर – हाळ युवक तालुका उपाध्यक्ष , जितू सकपाळ – राष्ट्रवादी , अशोक मराजगे – उपतालुकाप्रमुख , वासुदेव भोसले – खरवई , सौ शुभांगी संतोष हडप – उप तालुकाप्रमुख महिला मनसे , कृष्णा घाडगे – मा. नगरसेवक कर्जत , अनिल सानप – उबाठा उपशहर प्रमुख खोपोली , अजय दिघे – उद्योजक , आदी प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

कर्जत खालापूर मतदार संघातील ” नागरिकांची साथ , श्री विठ्ठलाच्या कृपेने ” तुमचा विधानसभेचा विजय निश्चित आहे , टिका हे कधी आपले , तर कधी विरोधक करत असतात , मात्र त्यांच्याकडे लक्ष देवू नका , जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे , आजचा हा पक्ष प्रवेश व हा जनसमुदाय तुमच्या ” विजयाची नांदी ” असल्याचे यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रकाश टाकला.
या मतदार संघात सर्वांत जास्त निधी आणून विकास कामे केली , असे कौतुक देखील त्यांनी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे केले . आज प्रवेश करणाऱ्या सर्वाँना मानसन्मान , गावांना निधी देण्याचे काम करा ,असे सूचित त्यांनी केले . तुम्ही धनुष्य बाणावर निवडणूक लढणार आहात , चिंता करण्याची गरज नाही , म्हणून संयम ठेवून कामाला लागा , असे महत्त्वपूर्ण मत मांडत ” ६० हजारांच्या ” मताधिक्याने तुम्हाला निवडून आणणार , असे आश्वासन त्यांनी दिले.
- Advertisment -

You cannot copy content of this page