स्वराच्या न्यायासाठी मावळ एकवटला, नराधमाला फाशीच्या शिक्षा दया…

0
657

पवनानगर प्रतिनिधी : मावळ तालुका मधील कोथूर्णे गावात सात वर्षीय चिमुरडीचा गळा कापून खून करण्यात आलेला होता. या खुनाचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून आरोपीला कामशेत पोलिसांनी अटक केली आहे. तरी या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पवनानगर मध्ये सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला होता.

या वेळी पवनानगर बाजार पेठ बंद ठेवून, सर्व नागरिकांनी काळे झेंडे दाखवत चिमुरडीला पंधरा दिवसाच्या आत न्याय मिळालाच पाहिजे, या नराधमाला फाशीच दिली पाहिजे अशा घोषणा देत यावेळी नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.तसेच ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे असे मत यावेळी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी व्यक्त केले.

यावेळी आमदार उमाताई खापरे ,माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे,रुपेश म्हाळस्कर, गणेश खांडगे,किशोर भेगडे,सचिन घोटकुले,नितीन घोटकुले,ज्ञानेश्वर दळवी,मुकुंद ठाकर,विश्वनाथ जाधव आदी नेतेमंडळी नागरिक व महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होते.