स्वरा हिच्या हत्ये निषेधार्थ मावळ बंदला वाकसई येथे उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
302

वाकसई प्रतिनिधी : कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलगी अपहरण व हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज मावळ बंदला वाकसई येथे उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला.

अल्पवयीन स्वरा चांदेकर हिचे अपहरण व हत्तेच्या बातमीने संपूर्ण मावळ तालुक्यात संताप व्यक्त केला जात असताना या हत्याकांड निषेधार्थ मावळातील व्यापारी वर्ग व नागरिकांनी मावळ बंद ची हाक दिली. अल्पवयीन स्वराला न्याय मिळावा तिच्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत वाकसई येथील व्यापाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेऊन मावळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अशा मनोवृत्तीच्या लोकांमुळे मुली गावातच सुरक्षित राहिल्या नाहीत, स्वरा हिच्या आरोपीला फाशीची शिक्षा दयावी म्हणजे या नराधमांना कायमची अद्दल घडेल आणि असे निंदनीय कृत्य करताना असे नराधम हजारो वेळा विचार करतील. या आरोपीला फाशीची शिक्षा मिळाल्यास स्वरा हीला न्याय मिळू शकेल असा संताप यावेळी वाकसई येथील व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आला.व स्वरा हीला श्रद्धांजली वाहण्यात आली.