Tuesday, May 30, 2023
Homeपुणेमावळस्व.आमदार लक्ष्मण जगताप यांना मावळ भाजपा कडून श्रद्धांजली वाहण्यात आली…

स्व.आमदार लक्ष्मण जगताप यांना मावळ भाजपा कडून श्रद्धांजली वाहण्यात आली…

मावळ (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड येथील भाजपचे पक्षनिष्ठ आमदार लक्ष्मण जगताप यांना मावळ भाजपाच्या वतीने वडगांव पक्ष कार्यालय येथे आदरांजली समर्पित करण्यात आली.
आमदार लक्ष्मण जगताप हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली.लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दुःखद निधनाने भाजपा परिवारात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून आज मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडगाव पक्ष कार्यालयात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी भाजपा सरचिटणीस सुनिल चव्हाण,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,क्रिडा आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे,उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, दिलीप गावडे,दत्तात्रय महाराज शिंदे,विठ्ठल तुर्डे,विकास घारे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page