Thursday, September 28, 2023
Homeपुणेलोणावळास्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त किनारा वृद्धाश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त किनारा वृद्धाश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

लोणावळा (प्रतिनिधी): अखंड हिंदुस्थानचे कैवारी,हिंदुस्थानचे एकमेव हिंदुहृदयसम्राट, हिंदू धर्मरक्षक,सरसेनापती, महानेता, वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त द्वारकाधीश मंगल कार्यालय वडगाव मावळ या ठिकाणी साहेबांच्या प्रतिमेची पूजा करून अभिवादन करण्यात आले.
तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून कामशेत अहिरवडे येथील किनारा वृध्दाश्रम या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख व जिल्हा संघटक मच्छिंद्र भाऊ खराडे, युवा सेना जिल्हाधिकारी अनिकेत भाऊ घुले, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख भारत दादा ठाकूर, उपजिल्हाप्रमुख सुरेश भाऊ गायकवाड, मा.विभाग प्रमुख संजय घोंगे,महिला जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, तालुका संघटिका अनिताताई गोनते, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत भोते, उपतालुकाप्रमुख अनिल ओव्हाळ, विभाग संघटक उमेश गावडे, वडगांव शहर प्रमुख राहुल नखाते,सुरेश गुप्ता, अक्षय येलवंडे, निखिल येवले, निलेश गोणते, हनु म्हस्के, शुभम गायकवाड, हिंदुराज कोंडभर, गौरव सुर्वे, विवेक गवारी, संतोष ढोरे,नागेश चव्हाण,तेजस खराडे, शुभम बनसोडे,प्रवीण कालेकर व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -