हजरत कासिम शाह वली उर्स शरीफ निमित्त ख्वाजा गरीब नवाज ट्रस्टकडून हजारो नागरिकांसाठी न्याजचे आयोजन…

0
77

लोणावळा : हजरत कासिम शाह वली रहे यांच्या उर्स शरीफ निमित्ताने माजी नागराध्यक्ष अमित प्रकाश गवळी व माजी उपनगराध्यक्ष भरत मारुती हारपुडे, माजी नगरसेवक नासीर शेख आणि मित्र परिवाराच्या वतीने दर्गा शरीफ येथे चादर आणि फुले चढविण्यात आली.

ख्वाजा गरीब नवाज कमिटी , सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टच्या वतीने न्याज ( भंडारा ) चे आयोजन करण्यात आले.त्याचबरोबर सुन्नी मुस्लिम ट्रस्ट व ख्वाजा गरीब नवाज ट्रस्टच्या वतीने उपस्थित मान्यवर माजी नगराध्यक्ष अमित गवळी, माजी नगरसेवक भरत हारपुडे, माजी नगरसेवक नासीर शेख, जाकीर खलिफा, शकील शेख, शकील बागवान, फारुख शेख, अमीर शेख, गिरीष कांबळे, पत्रकार संदीप मोरे इत्यादी मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्गा शरीफ येथे चादर चढवून फुले वाहण्यात आली. पूजा अर्चना झाल्यानंतर ख्वाजा गरीब नवाज ट्रस्टच्या वतीने न्याजला सुरुवात करण्यात आली. यावेळी असंख्य नागरिकांनी न्याजचा अस्वाद घेतला.