हनुमान मूर्ती रोप्य महोत्सव दिनानिमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचे मोहितेवाडी येथे आयोजन…

0
31

वडगाव मावळ : श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ व समस्त ग्रामस्थ मोहितेवाडीच्या वतीने संकटमोचन हनुमान मुर्तीचा रौप्य महोत्सव वर्धापन दिनानिमित्त मोहितेवाडी साते येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त अद्भुत रामायण कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंगळवार दि.19/4/2022 ते सोमवार दि.25/4/2022 पर्यंत मोहितेवाडी हनुमान मंदिरात आयोजित केला आहे.तरी पंचक्रोषीतील भाविक बंधु – भगिणींनी उपस्थित राहुन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात येत आहे.

पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 7 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 12 ते 1 गाथा भजन,दुपारी 1 ते 3 फराळ व विश्रांती पुन्हा सायंकाळी 3 ते 4 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 4 ते 5 विठ्ठल जप, 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 9 रामायण कथा, रात्री 9 ते 10 भोजन तसेच रात्री 10 नंतर हरिजागर असे दैनंदिन नियोजन असणार आहे.सोमवार 25/4/22 रोजी कथेची सांगता व काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन असणार आहे.