Monday, December 4, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडहम भी कुछ कम नही " शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितिनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली...

हम भी कुछ कम नही ” शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितिनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली पद नियुक्त्या जाहीर !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत नगर परिषद हद्दीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा ” वारू ” चौफेर उधळत असून उपजिल्हाप्रमुख तथा कर्जत न.प.चे जेष्ठ नगरसेवक नितीनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित होत असताना दिसत आहे . येणाऱ्या कर्जत न.प. च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योग्य मोर्चे बांधणी सुरू आहे.आज उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण वर्गास पद नियुक्ती करून येणाऱ्या निवडणुकीत विजयाचे वाटेकरी होण्यासाठी आपणही पक्षासाठी योगदान देऊन पक्ष मजबूत करा व या विजयात खारीचा वाटा उचलण्यासाठी त्यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी योगेश दिघे मुद्रे – बुद्रुक विभाग प्रमुख , अविनाश चौगुले – उपविभाग प्रमुख , तुषार बडेकर – शाखाप्रमुख , करण पाटील – उपशाखाप्रमुख , सतीश कोकणे – उपविभाग प्रमुख , दिनेश पाटील – उपविभाग प्रमुख , भालचंद्र बोराडे – विभाग संघटक , श्रवण मोधले – युवा सेना शाखा अधिकारी , करण तलेगावकर – युवा सेना उपशाखा अधिकारी , सौरभ ठाकरे – युवासेना विभाग अधिकारी , यांची पद नियुक्ती करण्यात आल्या.उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत यांच्या ” शिवालय ” संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शहर प्रमुख निलेश घरत , उपशहर प्रमुख मुकुंद मोधळे , उपशहर प्रमुख मुकेश पाटील , उपशहर प्रमुख प्रमोद खराडे , पंढरीनाथ राऊत – माजी तालुका प्रमुख , नगरसेविका संचिता पाटील , माजी नगरसेवक संतोष पाटील , युवासेना शहर प्रमुख गौरव भानुसघरे , शाखा प्रमुख महेंद्र मोरे , शाखा प्रमुख मगेंश गजमल , संदिप पाटील आदी प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page