Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगड" हर घर में काम " राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीण भागातील प्रत्येक...

” हर घर में काम ” राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीण भागातील प्रत्येक तरुण – तरुणीला रोजगार देणार-राजिपचे माजी उपाध्यक्ष सुधाकरशेठ घारे..

२३ एप्रिल रविवारी रॉयल गार्डन येथे होणार भव्य रोजगार मेळावा…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजिपचे माजी उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य – शिक्षण – क्रीडा यांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण बेरोजगार तरुण – तरुणीस नोकरी क्षेत्रात गरुड भरारी घेण्यासाठी बळ देणार असून ” नाते विश्वासाचे – उज्ज्वल भविष्याचे ” हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून राजिपचे मा . उपाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे यांच्या वतीने व जॉब कनेक्ट इव्हेंट यांच्या सहकार्याने युवक – युवतींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असून त्यासाठी कर्जतमध्ये प्रथमच ” भव्य रोजगार मेळावा ” रविवार दि.२३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ वाजता , रॉयल गार्डन कर्जत येथे आयोजित केला आहे . या मेळाव्यात सर्व बेरोजगार तरुण – तरुणींने उपस्थित राहून रोजगाराची संधी घ्या , असे आवाहन मा. सुधाकरशेठ घारे ( माजी राजिप उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य – शिक्षण – क्रिडा ) यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

यामध्ये एकूण ४० ते ५० नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आपल्या दारी आली असून यांत मॅन्युफॅक्चरिंग , फायनान्स रिटेल , सेल्स व मार्केटिंग , बँकिंग इन्शुरन्स , हॉस्पिटॅलिटी , फॅसिलिटी , टेलिकॉम व इतर आय.टी . बिपीओ / केपीओ , फार्मा ,अशी नोकरीची हमी मिळणार आहे . यासाठी शैक्षणिक पात्रता ८ ते १० वी , १२ वी , बी .ए . , एम . ए . , बी .कॉम. , एम .कॉम ., बीएससी , एमएससी , बीसीए , एमसीए , बीबीए , एमबीए , आय टी आय , बीई ( ऑल फॅकल्टी ) , डिप्लोमा व पदवीधर , असावेत , तर आपला नोंदणी अर्ज व बायोडाटा मेळाव्यास उपस्थित रहाणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक आहे.

नोंदणी अर्ज मिळण्याचे ठिकाण – श्री सुधाकर घारे यांचे जनसंपर्क कार्यालय , शिवश्रुष्टी अपार्टमेंट , श्रीराम पूल – कर्जत ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , कर्जत तालुका ,अधिक माहितीसाठी संपर्क – केतन बेलोसे – 8888914183 यांच्याशी संपर्क साधून या सुवर्ण संधीचा बेरोजगार युवक – युवतींनी लाभ घेऊन नोकरीची संधी प्राप्त करावी .या निमित्ताने कर्जत तालुक्यातील बेरोजगार ग्रामीण व शहरी तरुणाच्या प्रत्येकास ” हर घर में काम ” देण्याचे स्वप्न आम्ही साकार करू शकू , असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.उपाध्यक्ष सुधाकरशेठ घारे यांनी पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले.

You cannot copy content of this page