Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडहालिवली ग्रामपंचायतीमध्ये अपंग दिना निमित्त लाभार्थींना तीन हजार वाटप !

हालिवली ग्रामपंचायतीमध्ये अपंग दिना निमित्त लाभार्थींना तीन हजार वाटप !

सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांचा स्तुत्य उपक्रम..

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे) कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायत येथील आदर्श सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे नेहमीच प्रसिद्धीत असते. ग्रामपंचायत उपसरपंच , सदस्य यांचे सहकार्याने यावेळी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधुन गावातील अपंग लाभार्थींना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे चेकचे वाटप करण्यात आले . यावेळी सुर्याजी ठाणगे , मारूती बोराडे , कविता बोराडे , वर्षा मणेर , ऋषीकेश बोराडे , मंथन राणे , मयुरेश बडेकर , मुकेश वाघमारे या अपंग लाभार्थींना निधीचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे वेळी सरपंच सौ.प्रमिला बोराडे , उपसरपंच केतन बोराडे , सदस्य दत्ता मणेर , दर्शना बोराडे , सोनम जाधव , सुवर्णा बोराडे , मेघा बोराडे , ग्रामसेवक गणेश बडे , कर्मचारी सोपान बोराडे , मा.विभाग प्रमुख सुरेश बोराडे , ग्रामस्थ रमेश दिनकर ,मनोज बडेकर , मनोहर मणेर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत दिव्यांगाना पाच टक्के निधीचे वाटप करावे , असा शासन निर्णय आहे , परंतु यावर्षी आगामी निवडणुकांची चाहुल लागल्यामुळे पुढे आचार संहिता लागु झाल्यास निधीचे वाटप करता येणार नाही , हा दुरदृष्टिकोन ठेवून सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांनी हा निर्णय घेऊन सर्वांच्या सहकार्याने अपंग दिनाच्या निमित्ताने अपंग लाभार्थींना चेकचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. यापुर्वी ग्रामपंचायत मधुन अपंगाना विविध वस्तुंचे वाटप करण्यात येत असे.
परंतु सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांनी पदभार स्विकारल्यानंतर
गेली चार वर्ष दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या इच्छेप्रमाणे व गरजेनुसार निधीचा वापर करता यावा , यासाठी त्यांना तीन हजार रुपये चेकचे वाटप करण्यात आले.यावेळी मारूती बोराडे यांनी ग्रामपंचायतीने आजपर्यंत केलेल्या कामाचे व आता घेतलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले , तसेच गावातील सर्व दिव्यांग व्यक्तींच्या वतीने सरपंच , उपसरपंच ,सदस्य , ग्रामसेवक यांचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page