Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडहा मतदार संघ " शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे " यांच्या विचारांचा असल्याने येथे...

हा मतदार संघ ” शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ” यांच्या विचारांचा असल्याने येथे ” शिवसेनेचाच ” आमदार होईल – उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघ हा ” शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे ” यांच्या विचारांचा असल्याने येथे शिवसेनेचाच आमदार निवडून येवून भगवा फडकणार , अशी गगनभेदी गर्जना उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी ” शिवसंपर्क अभियान ” अंतर्गत कर्जत खालापूर विधानसभा संवाद दौऱ्या निमित्त मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ रोजी दुपारी ठीक ३ वाजता शेळके मंगल कार्यालय , कर्जत येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत उपस्थित युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समोर व उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले.


यावेळी व्यासपीठावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे , सचिन अहिर – विधानपरिषद आमदार , सौ. किशोरी ताई पेडणेकर – महिला संपर्क प्रमुख रायगड , रायगड संपर्क प्रमुख बबन दादा पाटील , संजोग वाघेरे पाटील , उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , कर्जत ता. प्रमुख उत्तम दादा कोळंबे , खालापूर ता. प्रमुख एकनाथ पिंगळे , महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी , रेखा ठाकरे , विधानसभा संघटिका कल्पना पाटील , जेष्ठ नेते भाई शिंदे , सुनील पाटील , संपर्क प्रमुख भिवसेन बडेकर , संघटक बाबू घारे , रियाज बुबेरे , उप तालुका प्रमुख दशरथ भगत , युवा सेना विधानसभा अधिकारी ऍड. संपद हाडप ,राजाराम शेळके , कर्जत ता. अधिकारी प्रथमेश मोरे , माथेरान मा. नगराध्यक्ष सावंत , कर्जत शहर प्रमुख निलेश घरत , बाजीराव दळवी , त्याचप्रमाने मतदार संघातील उप तालुका प्रमुख , विभाग प्रमुख , संघटक , शिवसेना – युवा सेना – महिला आघाडीच्या पदाधिकारी व तमाम शिवसैनिक या मेळाव्यास उपस्थित होते.


यावेळी शेळके मंगल कार्यालय महिला व शिवसैनिकांनी खचाखच भरला होता . जयघोषाने येथील वातावरण चांगलेच ज्वलंत झाले होते . ” आदित्य साहेब ठाकरे यांचा विजयी असो , ” नितीन दादा सावंत तुम आगे बढो , हम तुम्हारे साथ है ” अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले . उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या जोषपूर्ण भाषणाने शिवसैनिक पेटून उठल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळाले , यावेळी नितीन सावंत म्हणाले की , तुम्हा सर्व शिवसैनिक – युवा सेना – महिला आघाडीचे आभार मानण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे येथे आले आहेत . लोकसभेच्या निवडणुकीत आपण १८ हजारांचा लीड या मतदार संघात घेतला आहे . हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मतदार संघ असल्याने येथे आमदार देखील शिवसेनेचाच होईल , अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली , संवाद दौऱ्या निमित्त ८६ ग्रामपंचायत हद्दीत मी फिरलो , हा मतदार संघ उध्दव साहेबांच्या पाठीशी उभा राहिला आहे , या मतदार संघात मी सर्वांच्या मदतीने पुन्हा एकदा ” भगवा ” फडकावेन असे आश्वासन देतो , २ वर्षापूर्वीपासून या मतदार संघातील शिवसैनिकांनी खूप सहन केले आहे , मात्र आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत , असे अभिवचन त्यांनी दिले . येथे धरण आहे , पण पाणी नाही , कारखाने आहेत पण येथील तरुण बेरोजगार आहे , सुसज्ज रुग्णालये नसल्याने अनेक रुग्ण दगावतात , पर्यटन स्थळ आहेत पण परिसर सुस्थितीत नाही , अशी समस्या त्यांनी मांडली . भात शेतीची लावणी सुरू आहे , पंढरीची वारी सुरू आहे तरी या मेळाव्यास शिवसैनिक आवर्जून उपस्थित आहेत , अशी शाबासकीची थाप त्यांनी याप्रसंगी दिली.


लोकसभेच्या निवडणुकीत दिलेले १८ हजारांचे मताधिक्य , या मेळाव्यास जमलेला प्रचंड जनसमुदाय यामुळे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांना याचे श्रेय जातं असल्याने भविष्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विधानसभेची उमेदवारी त्यांचीच असेल , यांत शंकाच नाही.

- Advertisment -

You cannot copy content of this page