![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
तळेगाव (प्रतिनिधी): हिंदू जनगर्जना मोर्चा तळेगाव येथे संपन्न झाला.डोक्यावर भगव्या टोप्या, हातामध्ये भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या,’जय श्रीराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय च्या घोषनांनी दनानलेला जनआक्रोश मोर्चा रविवारी तळेगाव सिद्धिविनायक कॉलनीतील संतोषी माता मंदिरापासून निघाला. या मोर्चा मध्ये अखिल हिंदू समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडले. चार वर्षांच्या चिमुरडीपासून ते 87 वर्षांच्या आजोबापर्यंत अनेक जणांनी तसेच विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन म्हणजे फाल्गुन अमावस्या’ धर्मवीर दिन’ जाहीर करावा, तसेच लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या यांच्या विरोधात कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी व्हावी, याप्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार नितेश राणे, कालिचरण महाराज, आखाडा परिषद उपाध्यक्ष सुनीलशास्त्री महाराज, ऍडव्होकेट मृणाली पडवळ तसेच शंकर महाराज मराठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
तळेगाव स्टेशन सिद्धिविनायक कॉलनी येथील संतोषी माता मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली, त्यानंतर हा मोर्चा तळेगाव मधील मारुती चौक येथे आला. मोर्चामध्ये विविध पक्षातील व मावळ मधील अनेक हिंदू संघटनांचा सहभाग होता, वारकरी व महिलांचा विशेष सहभाग होता, तेथे झालेल्या सभेनंतर मोर्चाची सांगता झाली. याप्रसंगी नितेश राणे म्हणाले, “हिंदूनी एकत्र येण्याची गरज आहे कारण येणारा काळ हा हिंदूंवर संकटांचा असेल,हा आक्रोश नसून हिंदूंची गर्जना आहे. धर्मांतराच्या विरोधात लढणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. गाय ही आमची माता असून आम्ही गाईची कत्तल होऊ देणार नाही. व लोहगडावरील अनधिकृत बांधकामाविषयी देखील प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे” असे ते म्हणाले. कालिचरण महाराजांनी देखील आपल्या भाषणाची त्यांच्या खास शिवतांडव स्रोताने सुरुवात केली.
त्यांनी देखील हिंदु जनसमुदायाला भाषणातून हिंदुत्वाचे धडे दिले, त्याचप्रकारे सुनीलशास्त्री महाराजांनी महाराष्ट्र भूमी हे माझे आजोळ आहे व या आजोळाला महानच ठेवायचं असेल तर सर्व हिंदूंनी हातात हात घेऊन लढायला हवं असे ते म्हणाले. भारताला हिंदुराष्ट्र करायचं असेल तर असुरी शक्तीला वधर्मांतरासारख्या गोष्टींविरोधात लढले पाहिजे असेही ते म्हणाले. हिंदू जनगर्जना मोर्चा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी मावळ मधील बजरंग दल, विश्वहिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान, वारकरी संप्रदाय व तसेच विविध पक्षातीलनेत्यांनी सहकार्य केले, मावळमधील व विशेषतः तळेगाव मधील सर्व पक्ष संघटना नेत्यांनी मोर्चामध्ये एकत्रित येत आपले मतभेद बाजूला ठेऊन सहभागी झाल्याचे दिसून आले.