Tuesday, May 30, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडहेमंत नामदेव कोंडविलकर यांना " महाराष्ट्र रत्न " पुरस्काराने सन्मानित !

हेमंत नामदेव कोंडविलकर यांना ” महाराष्ट्र रत्न ” पुरस्काराने सन्मानित !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील बार्डी गावातील हेमंत नामदेव कोंडविलकर यांना Celebs and Gossips या संस्थेतर्फे ” महाराष्ट्र रत्न ” हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . त्यामुळे कर्जत तालुक्या बरोबरच आपल्या बार्डी गावाचे नाव दाही दिशा चमकविण्यात आल्याने हेमंत कोंडविलकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा ” महाराष्ट्र रत्न ” हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला . या मध्ये गेल्या दोन वर्षभरात ५० पेक्षा अधिक पोल्ट्री फार्ममधील कोंबडयांच्या विष्टेपासुन तयार होणाऱ्या दुर्गंधीवर उपाय योजना म्हणून पोल्ट्री धारक शेतकरी बांधवांना अल्पदरात दुर्गंधी घालविण्याचे कल्चर वापरून केलेल्या यशस्वी कार्याची दखल घेऊन ” महाराष्ट्र रत्न ” पुरस्कार ” रात्रीस खेळ चाले ” या मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेते ” विलास थोरात ” यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.हेमंत कोंडविलकर यांनी अविष्कार असे कार्य केल्याने त्यांची दखल Celebs and Gossips या संस्थेतर्फे घेऊन ” महाराष्ट्र रत्न ” हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याने संस्थेचे सतिश गायकवाड सर व संस्थेच्या सर्व पदाधिकारी वर्गांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
त्यांनी घेतलेल्या ” ध्यास विषमुक्त शेतीचा , प्रश्र नागरीकांच्या आरोग्याचा ” या त्यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांचे रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातील , चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील व बार्डी गावातील राजकीय – सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

You cannot copy content of this page