हॉटेल सागर चा शुभारंभाचा भव्य दिव्य सोहळा सिने अभिनेत्री अस्मिता सुर्वे उपस्थितीत संपन्न…

0
138

वाकसई : वाकसई फाटा येथील शुद्ध शाकाहारी सागर हॉटेलचा शुभारंभ सिने अभिनेत्री अस्मिता सुर्वे हिच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

वाकसई या ठिकाणी अनेक पर्यटक व एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची गैरसोय होत असताना त्यांच्या कडून अनेक पैसे मोजण्याची तयारी असून देखील त्यांना सोईस्कर राहण्याची सुविधा आपल्या भागात मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. तसेच त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शुद्ध शाकाहारी जेवण उपलब्ध व्हावे या हेतूने मारुती अण्णा देशमुख यांनी या “सागर”हॉटेल ची निर्मिती केली आहे.

शुद्ध शाकाहारी सागर हॉटेलच्या शुभारंभास आमदार सुनील शेळके यांच्या शुभाशीर्वादाने सिनेअभिनेत्री अस्मिता सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला.