Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअखिल गुरव समाज संघटनेचा व्रतबंध कार्यक्रमात आशीर्वाद देण्यासाठी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची...

अखिल गुरव समाज संघटनेचा व्रतबंध कार्यक्रमात आशीर्वाद देण्यासाठी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची उपस्थिती !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) अखिल गुरव समाज संघटना रायगड जिल्हा आयोजित व्रतबंध ( मुंज ) सोहळा उपनयन संस्कार शुक्रवार दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी शके १९४४ शुभकृतनामसंवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू माघ मासे कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी या शुभ मुहूर्तावर दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी हा कार्यक्रम कर्जत तालुक्यातील शिरसे – तमनाथ येथील राधामाई मंगल कार्यालयातील सभागृहात मोठ्या थाटामाटात प्रथमच पार पडला . या कार्यक्रमात ९३ कुमारांचा व्रतबंध ( मुंज ) करण्यात आला रायगड जिल्ह्यातील प्रथमच सामुदायिक मुंज सोहळा पार पडत असताना सर्वच अखिल गुरव समाजाला अत्यंत आनंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसण्यात आला.
अतिशय नियोजन बद्ध झालेल्या या सोहळ्यात गणेश पुण्यवाचन , मातृका पूजन , देव प्रतिष्ठा , पुण्य गायत्री मंत्र उपदेश , बटूची मिरवणूक , चौल कर्म , पूर्णाहुती , असा बहारदार कार्यक्रम राधामाई मंगल कार्यालय शिरसे – तमनाथ , ता.कर्जत जि. रायगड ,येथे संपन्न झाला.यावेळी आशीर्वाद देताना आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी भविष्यात अखिल गुरव समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमास आमदार महेंद्रशेठ थोरवे , खोपोली माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर , आप्पासाहेब शिंदे – संस्थापक अध्यक्ष अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र , बाळासाहेबांची शिवसेना नेते तथा उद्योजक संतोषशेठ भोईर , त्याचप्रमाणे जिल्ह्यातील व कर्जत खालापूर तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page