Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअखेर फिरत्या रिक्षा चालकांचा तिढा आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या उपस्थितीत सुटला...

अखेर फिरत्या रिक्षा चालकांचा तिढा आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या उपस्थितीत सुटला…

अखेर फिरत्या रिक्षा चालकांचा तिढा आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या उपस्थितीत सुटला…

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत नगर परिषद हद्दीत काही दिवसांपासून इतरत्र उभे राहून धंदा करणाऱ्या रिक्षा चालकांनी ” सर्व रिक्षा स्टँड खुले करा ” , ही मागणी घेऊन उपोषणाचा पावित्रा घेतला होता , म्हणून आर .टी. ओ.- पनवेल यांनी उपोषण करू नका , यावर मार्ग काढू ,असे आश्वासन दिल्याने काही दिवस गेल्यावर कर्जतमधील सर्व रिक्षा स्टँड संघटनांचे पदाधिकारी , रिक्षा चालक – मालक यांची संयुक्त बैठक कर्जत पोलीस ठाण्यात कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की , ( आर .टी .ओ. ) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी – पनवेल निलेश धोटे ,उप अधिकारी माळवे , कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे , कर्जत रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव ,रेल्वे आर.पी.एफ. निरीक्षक वर्मा , उपनिरीक्षक उबाळे , आदी प्रमुख अधिकारी वर्गांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी कर्जत रिक्षा स्टँड संघटनेचे पदाधिकारी , चालक – मालक तसेच आंदोलन करणारे रिक्षा धारक यांची बाजू ऐकून ” सर्व रिक्षा स्टँड खुले करा ” हि आंदोलन करणाऱ्या रिक्षा धारकांची मागणी धोकादायक असून उद्या प्रवाश्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ,तर कर्जत शहर सोडून इतरचा रिक्षा चालक देखील कर्जत शहरात धंदा करण्यास येऊ शकतात , तसेच कर्जत रेल्वे स्थानक येथे असलेली कमी जागा बघता सर्व रिक्षा तेथे थांबू शकत नसल्याने सर्वच रिक्षा तेथे प्रवासी भरण्यास उभ्या राहिल्यास होणाऱ्या गर्दीमुळे रेल्वे प्रवाशांना त्याचा त्रास होऊ शकतो.
याचा विचार करून भविष्यात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित रहावी म्हणून कर्जत हद्दीत आर.टी. ओ.ने मंजूर केलेल्या १२ रिक्षा स्थानकांमध्ये फक्त ८ रिक्षा स्टँड सुरू असून अजून रिक्षा स्टँड नव्याने तयार करून त्याची संख्या १५ वर नेणार असून आंदोलन करणारे रिक्षा धारक रेल्वे रिक्षा स्थानकात १० तर इतर रिक्षा स्थानकात ५ / ५ च्या संख्येने समाविष्ट करणार , याची लिस्ट तुम्ही द्या ,अन्यथा चिठ्या काढून प्रत्येक रिक्षा स्थानकात रिक्षा धारकांना समाविष्ट करणार , त्यासाठी कर्जत नगर परिषद समोर , नेमिनाथ इमारत – मुद्रे , कर्जत न्यायालय समोर , म्हाडा कॉलनी समोर , आमराई कर्जत आदी ठिकाणी स्टँड वाढविण्यास सुचविले तर इतरत्र बेकायदेशीर उभ्या रहाणारे रिक्षा स्टँड बंद करण्यात येऊन वाहतुकीस देखील अडथळा येणार नाही , व सर्वांना रोजगार मिळेल ,असे सांगून रेल्वे रिक्षा स्थानकाची जागा वाढविण्यासाठी रेल्वेचे डी. आर.एम.यांना पत्रव्यवहार करून विनंती करण्यात येईल , यासाठी जुने – नवे रिक्षा धारकांनी वाद करू नये ,अशी मांडणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
तर कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी कर्जत तालुक्यात १५६० रिक्षा असून अजून अनेक रिक्षा वेटिंगमध्ये असताना सर्वच रिक्षा कर्जत शहरात धंद्यासाठी आल्यास त्याचा वाहतुकीवर व नागरिकांना गर्दी होऊन त्रास होईल ,असे सांगून सर्वांनी सहकार्य करावे , व आर .टी. ओ. चे नियम पाळावेत , असे आवाहन केले.कर्जत रेल्वे रिक्षा स्टँड नं.१ येथील रिक्षा संघटनेचे अध्यक्ष उत्तम भाई जाधव यांनी आम्हाला आमदार महेंद्रशेठ थोरवे व सर्व अधिकारी वर्गात झालेला निर्णय मान्य असून कायदा – सुव्यवस्था व्यवस्थित रहाण्यासाठी रिक्षा संघटना व त्याचे पदाधिकारी कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावत असून रिक्षा चालकांच्या समस्या सोडवत असतात , यामुळे घराला – घरपण असत , असा मौलिक सल्ला देऊन सर्व रिक्षा धारक हे आपल्या कुटुंबाचे सदस्य आहेत , म्हणून घेतलेला निर्णय सर्वांच्या हिताचा असल्याचे सांगितले . त्यामुळे रिक्षा धारकांनी केलेले आंदोलनाला न्याय मिळाला असल्याचे दिसून येत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page