Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअखेर राजिप कडून dcps धारक शिक्षकांचा हिशोब मिळाला !

अखेर राजिप कडून dcps धारक शिक्षकांचा हिशोब मिळाला !

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या लढयास यश..

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे) देशातील नवीन पिढी घडविण्याचे अमूल्य कार्य करणारे शिक्षक वर्ग आपल्या मागण्यांसाठी नम्रतेची भूमिका घेतात , व तब्बल १५ वर्षे शांततेने लढा देऊन यशस्वी होतात , हे आजच्या घडामोडीत दिसून येत आहे सन २००५ पासून रायगड जिल्ह्यातील २००० हुन आधिक dcps धारक शिक्षकांच्या पगारातून dcps हफ्ता कपात होत होता , मात्र कपात झालेली रक्कम कुठे आहे, हेच शिक्षकांस समजत नव्हते ,त्या रक्कमेचा आजपर्यंत कुठलाही हिशोब शिक्षकांना मिळत नव्हता.सदर हिशोबासाठी जिल्ह्यातील विविध संघटनानी जिल्हा परिषदेस वेळोवेळी निवेदने दिली ,आंदोलनेही केली.

या योजनेस तब्बल १५ वर्ष उलटली मात्र तरीही याबाबत कुठलेही ठोस लेखी आश्वासन मिळाले नव्हते अखेर आज १३ जून २०२२ रोजी रायगड जिल्हा परिषद अलीबाग येथे dcps हिशोब पावत्यांचे वितरण मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

या डीसीपीएस हिशोबासाठी राजिप चे मा.सुधाकरजी घारे उपाध्यक्ष तथा मा.शिक्षण सभापती , मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील मा.मोतीरामजी ठोंबरे (जिल्हा शिक्षण समिती सदस्य ) ,सन्माननीय पुनिता गुरव मॅडम ,शिक्षणाधिकारी ,रायगड जिल्हा परिषदेतील शिक्षण व वित्त विभागातील सर्व अधिकारी -कर्मचारी तसेच संबंधित आस्थापनेचे कार्यभार सांभाळणारे अमित पंड्या सर यांचे विशेष सहकार्य लाभले. सन २०१५ पासून रायगड जिल्ह्यातील सर्व dcps धारक बंधु -भगिनिनी एकत्र येवून फार मोठा लढ़ा दिला होता या लढयास अखेर आज यश आले.


डीसीपीएस हिशोब पावती वितरण कार्यक्रमास प्रातिनिधिक स्वरुपात श्री राजेंद्र फुलावरे – राज्याध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संलग्न जुनी पेंशन हक्क संघटन,श्री राजेन्द्र म्हात्रे ,रायगड जिल्हाध्यक्ष – प्राथमिक शिक्षक संघ, दीपक पाटील – जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती , मस्तान बोरगे – तालुका अध्यक्ष म.रा.जु.पेंशन हक्क संघटन खालापूर, जितेंद्र ठाकूर – अध्यक्ष शिक्षक सेना खालापूर, सचिन जाधव- जिल्हा सचिव म.रा.जु.पेंशन हक्क संघटन, नागोठकर सर,यांची उपस्थिती होती . ऑनलाईन माहिती भरण्यासाठी खालापूर तालुक्यातील तज्ञ शिक्षक म्हणून मस्तान बोरगे , श्रीधर मुरलीधर शेंडे सर यांनी अत्यंत कटाक्षपणे अचुकपणे माहिती भरली. तर जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधु-भगिनींनी एकत्र येत ,तब्बल पंधरा वर्ष लढ़ा दिला ,या लढ़यास यश आले असून आज हिशोब मिळाला आहे, मात्र हा लढ़ा इथेच थांबणारा नसून जूनी पेंशन मिळेपर्यंत कायम सुरु राहील , असे मत राजेंद्र फुलावरे-राज्याध्यक्ष ,प्राथमिक शिक्षक संघ संलग्न जूनी पेंशन संघटन यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page