अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी.. - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home महाराष्ट्र रायगड अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी..

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी..

0

हालीवली सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांची शेतकऱ्यांप्रती खंबीर भूमिका..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्याला दि.२१ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टी होऊन नदीच्या पाण्याची पातळी वाढून गावांत – शहरात पाणी शिरल्याने महापूर आला होता.यांत नागरिकांच्या घरातील किंमती वस्तूंचे नुकसान झाले होते.तर अन्न-धान्यांची देखील नासाडी झाली होती.यातून शेतकऱ्यांची शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांनी तालुक्यातुन प्रथम शेतकऱ्यांप्रती पुढाकार घेऊन खंबीर भूमिका घेतली व शेतीचे नुकसान किती झाले आहे,याची तालुक्यातील कृषी अधिकारी यांना घेऊन शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.


अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील हालीवली गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.याची माहिती हालीवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांना समजताच त्यांनी लागलीच तालुक्याच्या कृषी अधिकारी संगीता पाटील यांच्या कानावर हि बातमी सांगितली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी संगीता पाटील ,सुवर्णा शिंदे , सरपंच सौ.प्रमिला बोराडे, मा .विभागप्रमुख सुरेश बोराडे, बलिराम बोराडे,रामदास बोराडे, कल्पेश बोराडे, प्रविण बोराडे,रमेश शिंदे,हरीश्चंद्र जाधव,रंभाजी शिंदे आदींनी जाऊन अनेक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली.

व त्याचे पंचनामे करण्यात आले.हालीवली सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांच्या या भूमिकेमुळे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page

Exit mobile version