Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला दहा दिवसांच्या गणपतीचे बाप्पाचे विसर्जन…

अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला दहा दिवसांच्या गणपतीचे बाप्पाचे विसर्जन…

कर्जत प्रतिनिधी:गुरुनाथ नेमाणे

दि.१.कर्जत तालुक्यातील या दिवशी भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी बाप्पाचे विसर्जन करत असतात.यावेळी अनंत चतुथुर्ती दिवशी विशेष महत्व आहेत.या दिवशी पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला.पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रतकरण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला आहे.

यावेळी आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते.अनंत हे एका महानागाचे नाव असले आणि हे नाव जपणे पुण्यकारक मानले जात असले तरी अनंत हे विष्णुचे नाव आहे, हे नजरेआड करता नये.


अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णुची ‘अनंत’ ह्या नावाने पूजा केली जाते.अनंत चतुर्दशीचे व्रत असे संबोधले जात आहे.हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणूनच ओळखला जातो.हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्वप्रकारच्या संकटापासून रक्षण करतो,अशी श्रद्धा असते.अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचा दिवस आहे.याप्रसंगी अनंत चतुर्दशीचे महत्त्व अधिक गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केली जात असते.

सदर यावर्षी कोरोनाच्या महामारीत शासनच्या नियमानुसार आपापले गणपती बाप्पा विसर्जन केले जात आहे.आपल्या सोयी नुसार बाप्पा ना विसर्जन करण्यात आले आहेत.यावेळी जलाशयात तलाव हौध,विहिरी अशा ठिकाणी केले जात असतात कोणत्याही प्रकारे प्रदूषण होऊ नये या करिता काळजी घेण्यात आली आहे. यावेळी गणेशभक्त साध्य आणि सोप्या पद्धतीने विसर्जन करणयात आले आहेत.

यावर्षी काळात कोरोनाचा संसर्ग असल्याने जल्लोष साजरा करता आलेले नाही,तसेच गणेशभक्त भाविक भक्तांनी भजन आरती गणपती बाप्पा मोरया गर्जना करू नेहण्यात आले.”गणपती गेले गावाला चयन पडले ना,आम्हाला” गणपती बाप्प्पा मोरया पुढच्या वर्षा लवकर या….!

- Advertisment -

You cannot copy content of this page