Friday, March 29, 2024
Homeक्राईमअपघाताचा बनाव करून खून करणाऱ्या आरोपीस तासाभरात अटक.. लोणावळा ग्रामीण पोलिसांची कामगिरी..

अपघाताचा बनाव करून खून करणाऱ्या आरोपीस तासाभरात अटक.. लोणावळा ग्रामीण पोलिसांची कामगिरी..

लोणावळा दि.19: लोणावळा ते मुंबई हद्दीत द्रुतगती महमार्गावर अपघाताचा बनाव करून खुनाचा कट मार्गी लावणाऱ्या आरोपीस लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या तासाभरात केले जेरबंद.


त्यासंदर्भात आरोपी रामदास भिमराव ओझरकर याला नाकाबंदी करत अटक करून याच्या विरोधात गु. र. नं.91/2021, भा. द. वी. कलम 302,307 असा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून आज सकाळी 10 वा. सुमारास मयत सतीश ओझरकर हा त्याच्या मोटर सायकलवरून भाजे गाव ते लोणावळ्याच्या दिशेने जात असताना आरोपी रामदास भिमराव ओझरकर याने त्याच्याकडील (मारुती सुझुकी 800) या वाहनाने मागून जाऊन मयत सतीश याला जीवे मारण्याच्या हेतूने जोरदार धडक दिली.

जोरदार धडक बसल्याने मयत सतीश हा खाली पडला असता आरोपी रामदास याने गाडीतून खाली उतरून जवळील लोखंडी रॉडने खाली पडलेल्या सतीश याच्या डोक्यावर व शरीरावर जोरात मारहाण केली, गंभीर दुखापत झाल्याने सतीश याचा जागीच मृत्यू झाला.

वाहनाने ऐका इसमास उडविले असल्याची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूला विचारपूस केली असता धडक दिलेले वाहन हे लोणावळ्याच्या दिशेने गेल्याचे समजताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी लोणावळा ग्रामीण हद्दीत नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी नाकाबंदी मध्ये आरोपी रामदास ओझरकर याची गाडी समोरील बाजूस धडकल्याचे दिसून आल्यास त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता जुन्या भांडणातून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली.


पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पो. अधीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पो. अधीक्षक नवनीत कॉवत, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो. निरीक्षक निलेश माने, पो. उपनिरीक्षक अनिल लवटे, सहाय्यक पो. उपनिरीक्षक शिंदे, पो. हवालदार जिवराज बनसोडे, शकील शेख, पो. नाईक देविदास चाकणे, मयूर अबनावे, पो. शिपाई सिद्धेश शिंदे, स्वप्नील पाटील, मच्छिन्द्र पानसरे, ऋषिकेश पंचरास, हनुमंत शिंदे यांच्या पथकाने अवघ्या तासातच आरोपीस ताब्यात घेत अटक केली.

- Advertisment -

You cannot copy content of this page