Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअरिहंत अलोकीला टाकलेली बेकायदेशीर पाण्याची लाईन काढून टाका !

अरिहंत अलोकीला टाकलेली बेकायदेशीर पाण्याची लाईन काढून टाका !

भिसेगाव येथील महिलांची मागणी , अजूनही पाण्याची समस्या जैसे थे..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे)कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागात ” अरिहंत अलोकी ” या इमारत प्रोजेक्टला मुख्य पाण्याच्या लाईनला ४ व्यासाचा पाईप जोडून थेट टाकीपर्यंत नेऊन नंतर २ व्यासाची पाईप लावून नंतर अर्धा इंचाची पाण्याची टाकलेली लाईन हि बेकायदेशीर असून त्यामुळे पाण्याचा संपूर्ण प्रवाह अरिहंत अलोकी या इमारत प्रोजेक्टकडे वळत असल्याने कर्जत न.प. च्या पाणी विभागाने केलेले काम हे संशयास्पद असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाणी येत नसल्याने दैनंदिन कामे करण्यास पाणी कोठून आणायचे , असा संतप्त सवाल येथील महिला करत असून ताबडतोब ती मोठी टाकलेली बेकायदेशीर पाणी लाईन काढून टाकावी , अशी मागणी पालिकेस तक्रार अर्ज करून केली आहे.

ज्या पद्धतीने अरिहंत अलोकी या इमारत प्रोजेक्टला पाण्याची मोठी पाईप लाईन जोडली आहे , याबाबत कुठेतरी पाणी मुरत असून , अश्या पद्धतीने मुख्य पाईप लाईनला कुठेही मोठी पाईप लाईन जोडली जात नाही . मात्र इमारतींच्या बिल्डरांना ” चोचले ” पुरवून स्थानिकांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या कर्जत नगर परिषदेच्या कारभारावर येथील महिलांनी संताप व्यक्त केला आहे . दि.६ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार करून अजूनही पाण्याची हि गंभीर समस्या सोडविली नसल्याने महिलांना पाणी प्रश्नांचा खूपच त्रास होत आहे.

.पाणी विभागाच्या या बेकायदेशीर कारभारावर ना नगराध्यक्षा , ना मुख्याधिकारी की ना पाणी पुरवठा सभापती यांचा अंकुश नसल्याने पाणी खात्यातील कामगार आपल्या मनमानी कारभारामुळे येथील रहिवासी व महिलांना पाण्यापासून वंचित ठेवत असल्याने सोमवार पर्यंत जर पाण्याची समस्या सोडविली नाही व अरिहंत अलोकी या इमारत प्रोजेक्टला दिलेली बेकायदेशीर पाण्याची मोठी लाईन काढली नाही , तर कर्जत नगर परिषदेवर ” हंडा मोर्चा ” काढणार असल्याचे भिसेगाव येथील परिसरातील महिलांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page