Friday, April 19, 2024
Homeपुणेलोणावळाआंतर भारती बालग्राममध्ये मुलांविषयी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न...

आंतर भारती बालग्राममध्ये मुलांविषयी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न…

लोणावळा : इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी संचलित आंतर भारती बालग्राम येथे प्रकल्प प्रमुख डॉ.शुभांगी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015 ( जे.जे.ऍक्ट व सी . डब्ल्यू . सी . ) या संदर्भात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेसाठी संस्थेच्या कार्यकारी अधिकारी मेधा ओक व संस्थेचे अकाउंट हेड संतोष चव्हाण हे उपस्थित होते . सदर कार्यशाळेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणुन विजय बाविस्कर व वाशिम शेख यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत डॉ.शुभांगी भोर यांनी केले.

या कार्यशाळेचा उद्देश संस्थेच्या कार्यकारी अधिकारी मेधा ओक यांनी स्पष्ट करून सांगितला . कार्यशाळेचा लाभ संस्थेच्या सदन माता , शिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांनी घेतला . डॉ . शुभांगी भोर यांनी आभार प्रदर्शन केले . अत्यंत उपयुक्त अशी ही एक दिवसीय कार्यशाळा खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

- Advertisment -

You cannot copy content of this page