Thursday, April 18, 2024
Homeपुणेतळेगावआंबी येथील शेतात सापडले "लेथिस सॉफ्ट शेल्ड टर्टल "जातीचे कासव !

आंबी येथील शेतात सापडले “लेथिस सॉफ्ट शेल्ड टर्टल “जातीचे कासव !

तळेगाव दाभाडे : आंबी गावातील भात शेतात “लेथिस सॉफ्ट शेल्ड टर्टल” जातीचे दुर्मिळ कासव सापडले आहे .

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री मावळ तालुक्यातील आंबी गावात भात लावणी चालू असलेल्या निलेश खोजगे शेतकऱ्याच्या शेतात हे दुर्मिळ कासव सापडले आहे . त्याला लेथिस सॉफ्ट शेल्ड टर्टल असे म्हणतात . ही कासवाची गंभीरपणे धोक्यात असलेली प्रजाती आहे . लोक यांची शिकार करतात त्यामुळे त्यांची संख्या खूप कमी झाली आहे.


ही कासवे जुलै ते सप्टेंबर महिन्यात दिसतात . कारण हा त्यांचा विनीचा हंगाम असतो . खोजगे म्हणाले , की रात्री भात लावणी चालू असताना शेताच्या एका बाजूला खूप कावळे ओरडत असताना दिसले . तिथे जवळ गेल्यावर कासव दिसले.आम्ही ते ताब्यात घेतले व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांना बोलावले . बी वाइल्ड फोरमच्या सदस्यांनी त्या कासवाचे वजन केले.त्याची लांबी व इतर माहिती घेऊन नोंद केली . त्या कासवाची तपासणी केली असता त्याला कोणतीही जखम असल्याची आढळली नाही.त्यामुळे त्याला जाधववाडी येथील तलावात सोडण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page