Friday, April 19, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडआदित्यच्या मारेकऱ्यांना गुंडा विरोधी पथकाने ठोकल्या बेडया, 20 लाखाची मागितली खंडणी...

आदित्यच्या मारेकऱ्यांना गुंडा विरोधी पथकाने ठोकल्या बेडया, 20 लाखाची मागितली खंडणी…

पिंपरी (प्रतिनिधी) : आदित्य या 7 वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपींना गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत .

या प्रकरणात 20 कोटींची खंडणी ही आरोपींनी मागितली असल्याची माहिती आहे . आदित्य आगले ( वय 7 वर्षे ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे . या प्रकरणी मुख्य आरोपी मंथन किरण भोसले आणि अनिकेत समदूर यांना अटक करण्यात आली आहे . आदित्यचा मृतदेह रात्री भोसरी MIDC परिसरात आढळून आला आहे .

आदित्य हा गुरुवारपासून बेपत्ता होता , त्याचा शोध कुटुंबीय घेत होते . या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मुख्य आरोपी मंथन किरण भोसले हा मयत आदित्यच्या सोसायटीत राहत आहे . मंथन याने मित्राच्या मदतीने अपहरणाचा कट रचला . अपहरण करण्यासाठी चारचाकी गाडीला काळी फिल्म लावण्यात आली.

गुरुवारी संध्याकाळी आदित्य सोसायटीच्या खाली खेळण्यास आला त्याचवेळी त्याचे अपहरण करण्यात आले .तसेच आदित्यच्या कुटुंबियांच्या व्हाट्सएपवर 20 कोटींची खंडणी मागण्यात आली . परंतु , अवघ्या काही तासातच आरोपीपर्यंत पोहचत गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत . या प्रकरणी पिंपरी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page