Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआदिवासी भागात तहान भागविण्यासाठी शिवसेनेचा सेनापती सरसावला !

आदिवासी भागात तहान भागविण्यासाठी शिवसेनेचा सेनापती सरसावला !

उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत यांच्या नेतत्त्वाखाली ” शिवजल संजीवनी अभियानाला ” कर्जत तालुक्यातून जोरदार सुरुवात…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालक्यातील ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला येथील आदिवासी बांधव व इतर नागरिकांना सामोरे जावे लागते . मात्र शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे कर्जत – खालापूर मतदार संघाचे सेनापती तथा उपजिल्हाप्रमुख , पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन दादा नंदकुमार सावंत यांनी हि महत्वाची समस्या लक्षात घेवून पाणी समस्या सोडविण्यासाठी सरसावले असून या कार्यात ते यशस्वी झाले आहेत . यानिमित्ताने शिवजल संजीवनी अभियान यांस कर्जत तालुक्यातील झुगरेवाडी येथून सुरुवात करून ग्रामस्थांची तहान भागविण्यात उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत यशस्वी झाले.

” अचूक वेळ – योग्य निर्णय ” असा आजवरचा अनुभवाच्या जोरावर उपजिल्हाप्रमुख नितीनदादा नंदकुमार सावंत यांच्या संकल्पनेतून ” शिवजल संजीवनी अभियानाला ” कर्जत तालुक्यातून सुरुवात झाली असून कर्जत तालुक्यातील विविध गावात त्याचबरोबर वाड्यापाड्यात भीषण पाणी टंचाईवर मात करून या संकटातून मार्ग काढण्यासाठी स्वखर्चातून अनेक वाडी वस्तीत बोअरवेल मारण्याचा संकल्प केला असून पहिल्या टप्यात १) आंभेरपाडा, २) काठेवाडी, ३) चिमटेवाडी, ४) मोहपाडा, ५) बांगरवाडी, ६) ढाबेवाडी, ७) बोंडेशेत, ८) झुगरेवाडी येथे बोरवेल मारण्यात आल्या असून येथील पाणी टंचाईवर बऱ्यापैकी मात करण्यात उपजिल्हाप्रमुख नितीनदादा नंदकुमार सावंत यशस्वी झाले असून पुढील टप्प्याला आता सुरवात झाली आहे.

झुगरेवाडी येथील पाणी टंचाई सोडवण्यात उपजिल्हाप्रमुख नितीनदादा नंदकुमार सावंत यांना यश आले आहे तर येथील तळागाळातील महत्वपूर्ण समस्या सोडवण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत आहेत . झुगरेवाडी येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती , कळंब जिल्हा परिषद विभागातील अनेक वाड्यापाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी शासनातर्फे टँकर ची व्यवस्था केली जाते . खरंतर यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असतांना त्याकडे शासनाचा वेळोवेळी दुर्लक्ष होतांनाच दिसून येत होता.
त्यामुळे आपल्या पक्षाच्या वतीने काहीतरी ठोस कार्यवाही करण्याचे त्यांनी ठरविले त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी सर्व्हे करून भूजलाची पाहणी केली आणि त्यातून भू गर्भातील मोठ्या क्षमतेचे साठे शोधून त्यावर बोरवेल मारून गावातील समस्या सोडविण्यास सुरुवात केली. उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी बोंडेशेत येथे बुधवार दिनांक २४ मे २०२३ रोजी झुगरेवाडी येथे बोअरवेल मारुन दिली. झुगरेवाडी येथील बोअरवेलला तर ३ ते ४ इंच पाणी लागल्याने ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा केला. बोअरवेलला पाणी लागल्याचा आनंद इतका होता की ग्रामस्थांच्या डोळ्यात आनंद अश्रू येत होते. सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता.
उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत यांच्या समाजसेवेच्या कामावर सर्वच ठिकाणी कौतुक होत असून त्यांनी अशीच समाजसेवा गोरगरिबांसाठी सुरू ठेवावी आणि त्या पुण्याईच्या जोरावर आणि गोरगरिबांच्या आशीर्वादाने आमदार व्हावेत अशी जनभावना सर्वांच्या मधून उमटत आहेत . शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झाल्यापासून दोन्ही तालुक्यातील अनेकांचा शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्ष प्रवेश करून ताकद वाढवून संघटना दोन्ही तालुक्यात जिवंत ठेवण्याचे काम केले. ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून १६ ठिकाणी हायटेक प्रणाली वापरून सर्व्हे केले तर ८ ठिकाणी बोरवेल मारून दिल्या आहेत , परिपूर्ण अभ्यास करून बोअरवेल मारण्याचा धडाका सुरू आहे.
येणाऱ्या काही दिवसात अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करायचे असा विकासकामांचा संकल्प त्यांनी हाती घेतले असून ते मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. येणाऱ्या काही दिवसात ग्रामीण भागातील वाड्यापाड्यातील मूलभूत प्रश्न निकालात काढण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत शिवसेना म्हंटल की , ” ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ” परंतु नितीन नंदकुमार सावंत यांचे काम म्हणजे १००% समाजकारण त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसैनिक उपजिल्हाप्रमुख नितीनदादा नंदकुमार सावंत यांना आमदार केल्याशिवाय शांतपणे बसणार नाहीत.
शिवालय मध्यवर्ती कार्यालयातून सर्वसामान्यांना अनेक माध्यमातून मदतीचा हात पुढे करत आहेत , त्यामुळे अनेक वर्षानुवर्षे मार्गी न लागणारी कामे स्वतः पुढे येऊन मार्गी लावत असून वेळप्रसंगी स्वखर्चातून देखील करत आहेत. त्यामुळे शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, युवासेना कर्जत तालुका सचिव अ‍ॅड.संपत पांडुरंग हडप, माजी सभापती पंढरीनाथ राऊत, माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके, प्रभारी उपतालुका प्रमुख दिनेश भोईर, विभाग प्रमुख लक्ष्मण पोसाटे, माजी विभाग प्रमुख संतोष ऐनकर, सुमित चंदन, विक्रम गुरव, झुगरेवाडी शाखाप्रमुख गणपत केवारी (वाणी) उपशाखा प्रमुख वसंत पारधी आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शिवसैनिक – युवासैनिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page