Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रयत्नांना यश !

आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रयत्नांना यश !

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना व्याजासहित पैसे परत मिळणार , जागेचे मूल्यांकन करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) बारा वर्षे वाट बघावी लागलेल्या पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना व खातेदारांचा तिढा अखेर कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या अथक प्रयत्नाने सुटला असून आज झालेल्या सह्याद्री येथील बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेबांनी जप्त केलेल्या जागेचे मूल्यांकन करून त्या जागा विकून ठेवीदारांना व खातेदारांना व्याजासहित पैसे परत मिळणार असे आश्वासन दिले.रायगड जिल्ह्यातील पेण येथे मुख्यालय असलेल्या पेण अर्बन बँकेचे एकूण १ लाख ९८ हजार ठेवीदार रायगड जिल्ह्यात व नवी मुंबई येथे असून त्यांचे ८०० कोटी रूपयांच्या ठेवी बँकेत आहेत.
आज १२ वर्षे या बँकेचे संचालक धारकर यांनी बँक घोटाळा करून सर्वसामान्य ठेवीदार व खातेदारांना मरण यातनेत ढकलले होते . मात्र म्हणतात ना , ” भगवान के घर , देर है , पर अंधेर नही ” , म्हणूनच वारंवार पेण अर्बन बँकेबाबत निर्णय घ्या , असे मुख्यमंत्री यांना कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी सांगितल्याने आज झालेल्या बैठकीत सिडको च्या अधिकारी वर्गाने सरकारच्या ताब्यात जप्त असलेल्या जागेचे मूल्यांकन करून ठेवेदारांना ६ टक्के व्याजाने पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत.
पेण अर्बन बँकची सुमारे दोन हजार कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता आहे.अखेर आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रयत्नांना यश येऊन ठेवीदारांना मुख्यमंत्री यांच्या आदेशाने दिलासा मिळाला आहे . त्यामुळे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची सर्वत्र वाहवा होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page