Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते नवीन पुलाचे भूमिपूजन संपन्न !

आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते नवीन पुलाचे भूमिपूजन संपन्न !

श्रीराम पुलावरील वाहतुकीची कोंडी कायमस्वरूपी दूर होणार..

भिसेगाव – कर्जत( सुभाष सोनावणे ) कर्जत शहरातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आज कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे व इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी जमलेल्या मान्यवरांच्या व कर्जतकरांच्या उपस्थितीत आज भूमिपूजन सोहळा पार पडला . सदरचा पूल हा श्रीराम पुलाच्या लगत होणार असून या कामासाठी ७ कोटी रू.मंजूर झाले असून अडीच कोटी रुपये परिसर काँक्रीटीकरण यासाठी खर्ची होणार असून सदरच्या कामाचा कार्यारंभ सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मुरबाड – शहापूर – कशेळे – कडाव – कर्जत – चौक रस्ता राष्ट्रीय महामार्ग वरील असलेल्या उल्हासनदीवरील श्रीराम पुलाच्या बाजूलाच दुसऱ्या पुलाचे बांधकाम होण्यासाठी व श्रीराम पुलाच्या दोन्ही बाजूस जंक्शन सुधारणे करणे कामी आज आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते श्रीराम पुलालगत मोठ्या पुलाचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन पार पडले.
अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या कामाचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या कार्यारंभ काम ठेकेदारांनी लवकरात – लवकर चांगल्या प्रतीचे करून भविष्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी हा प्रयत्न असून ” कर्जतच्या नंदनवनात ऐतिहासिक वास्तू ” म्हणून या पुलाचा उल्लेख होणार असल्याचे मत कर्जत – खालापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी व्यक्त केले . सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण आणि आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रयत्नातून अखेर या कामास यश प्राप्त झाले आहे.
यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , संतोष शेठ भोईर , संघटक शिवराम बदे , तालुका प्रमुख संभाजी जगताप , संपर्क प्रमुख पंकज पाटील , मा.उपसभापती मनोहरदादा थोरवे , आरपीआय ( आठवले ) पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड , नगरसेवक राहुल डाळींबकर , सायली शहासने , युवासेना अधिकारी जयेंद्र देशमुख , शहरप्रमुख अभिषेक सुर्वे , सचिन भोईर , नगरसेवक संकेत भासे ,आरपीआय ता.अध्यक्ष हिरामण गायकवाड , वेणगाव माजी सरपंच व सदस्य अभिषेक गायकर , सुनील ठाकूर , किशोर कदम , प्रदीप वायकर , शहर संघटक नदीमभाई खान , वैभव सुरावकर , दिनेश कडू , सनी चव्हाण , रत्नाकर बडेकर , उपशहर प्रमुख मोहन भोईर तसेच ” बाळासाहेबांची शिवसेनेचे ” तालुक्यातील पदाधिकारी , शिवसैनिक , कर्जतकर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page