Thursday, April 25, 2024
Homeपुणेलोणावळाआयएससीई बोर्ड 10 वी च्या परीक्षेत 92.17% गूण संपादन करून ग्रामीण भागातील...

आयएससीई बोर्ड 10 वी च्या परीक्षेत 92.17% गूण संपादन करून ग्रामीण भागातील कु. वीरा जितेंद्र बोत्रे हिने वाढविले नावलौकिक…

लोणावळा (प्रतिनिधी) : इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (ICSE) इंटरनॅशनल बोर्ड माध्यमातून इयत्ता 10 वी परीक्षा मध्ये वेहेरगाव या ग्रामीण भागातील कुमारी वीरा जितेंद्र बोत्रे ह्या विद्यार्थिनीने रायवुड इंटरनॅशनल स्कूल लोणावळा मधुन 92.17 % गुण मिळवून शहरातून चौथ्या क्रमांकावर यश संपादन केले आहे.
कमी वेळात जास्त अभ्यास करून तो लक्षात कसा ठेवायचा यासाठी आई वडील व गुरुजणांनी योग्य मार्गदर्शन केले,आणि स्वतः त्यानुसार एकाग्रता करून अभ्यास केला असून या यशाचे श्रेय तिने आई वडील व गुरुजनांना दिले.तसेच एवढ्याच यशावर मी थांबणार नसून युपीएससी मधून आयपीएस अधिकारी होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते पूर्ण करण्यासाठी मी सर्वस्वी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय तिने व्यक्त केला आहे.
कुमारी वीरा जितेंद्र बोत्रे या विध्यार्थिनीने आयसीएसई (ICSE) बोर्डाकडून परीक्षा देऊन 92% गुण मिळवत चतुर्थ क्रमांकावर घवघवीत यश संपादन करून लोणावळा शहरासह ग्रामीण भागाचे नावलौकिक केले आहे.तिच्या ह्या यशासाठी सर्व स्तरातून तीचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page