Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळाआय आर बी विरोधातील रास्ता रोको ला लोणावळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

आय आर बी विरोधातील रास्ता रोको ला लोणावळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

लोणावळा दि.20:लोणावळ्यात होत असलेल्या अपघाताच्या निषेधार्थ आय आर बी च्या विरोधात लोणावळेकरांचा रास्ता रोको.

राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबीच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वलवण ते खंडाळा दरम्यान वारंवार अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत . असे असताना वरील दोन्ही यंत्रणा लोणावळा परिसरात कोणतीही उपाययोजना करत नसल्याने त्यांच्या विरोधात हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनास लोणावळा शहरातील जागृत नागरिक तसेच लोणावळेकर मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी आंदोलकांकडून आय आर बी यंत्रनेचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या, तसेच यावेळी लोणावळा शहरातून वाहतूक करणारी अवजड वाहने बंद करा या मुद्द्यावर जोर देत कुसगांव टोल नाक्यावरील डबल टोल बंद करावा, मनशक्ती केंद्र ते खंडाळा दरम्यान महामार्गावर अपघात रोखण्यासाठी अपघाताच्या ठिकाणी गती रोधक लावणे,मनशक्ती केंद्र ते खंडाळा रोडवर रस्ता दुभाजक व पथ दिव्यांची सोय करावी,मनशक्ती ते दुसरा पेट्रोल पंप रस्ता रुंदीकरण व्हावा , पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा ते नाझर टर्न येथील वळण काढून सरळ रस्ता बनविणे, अवजड वाहनांना या महामार्गावरून बंदी असावी तसेच खोपोली वरून राजमाची खंडाळा जुन्या रोड मार्गे येणारी अवजड वाहने बंद करावीत अशा रास्त मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आय आर बी ने या मागण्या पूर्ण न केल्यास द्रुतगती मार्गावर तीव्र आंदोलन करून चक्का जाम केला जाईल असे आवाहन यावेळी आंदोलकांनी केले आहे.वरील मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे दिले असता आम्ही आपण सर्व मागण्या पूर्ण करू व प्रामुख्याने लोणावळ्यातून वाहतूक करणारी अवजड वाहने नक्कीच बंद करू असे आश्वासन बर्गे यांनी आंदोलकांना दिले आहे.

लोणावळ्यातील जागृत नागरिकांच्या वतीने व समस्त नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोको मुळे जवळजवळ एक तास वाहतूक ठप्प झाली होती.

- Advertisment -

You cannot copy content of this page