Friday, April 19, 2024
Homeपुणेआरपीआय (आंबेडकर) पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अंकुश चव्हाण यांना " युवा भुषण...

आरपीआय (आंबेडकर) पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अंकुश चव्हाण यांना ” युवा भुषण पुरस्कार “प्रदान…

पुणे दि.2: शिरोली येथील ” निर्मिका फौंडेशन ” आयोजित सन्मान सोहळ्यात मावळातील अंकुश चव्हाण यांना युवा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आज खेड तालुक्यातील शिरोली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात निर्मिका फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिषभाई देखणे यांच्या हस्ते अंकुश चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आंबेडकर ) पक्षाचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष व जोशाबा मजूर कष्टकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अंकुश चव्हाण यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना युवा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page